Pulsar N250 फक्त 16 हजारात खरेदी करा; आकर्षक लूक, जबरदस्त मायलेज अन बरंच काही

टाइम्स मराठी । जर तुम्ही दमदार बाईक घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंटच्या बाईक उपलब्ध आहेत. देशात वेगेवगेळ्या कंपन्या एकामागून एक जबरदस्त आणि अपडेटेड फीचर्स सह बाईक लाँच करत आहेत. त्यातही बजाज कंपनीच्या Pulsar N250 या गाडीची क्रेझ तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आकर्षक लूक, दमदार मायलेज आणि चालवायला सुद्धा अतिशय स्मूथ अशा Pulsar N250 ची मार्केट प्राईझ 1.31 ते 1.50 लाख रुपयांपर्यंत आहे. परंतु तुम्ही अवघ्या १६ हजारात ती खरेदी करु शकता. कसे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

   

भारतीय बाजारात Pulsar N250 या बाईकची सुरुवातीची किंमत 1.31 लाख ते 1.50 लाख रुपयांपर्यंत आहे. तुम्ही ही गाडी Carribbean Blue, Racing Red, Techno Grey या तीन रंगात खरेदी करू शकता. बाईकची किंमत तुम्हाला परवडत नसेल आणि रोख रक्कम देऊन खरेदी करता येत नसेल तर तुम्ही 16000 रुपयांच्या डाउनपेमेंटच्या सहाय्याने तुम्ही ही बाईक घरी घेऊन जाऊ शकता. यासाठी तुम्हाला 9.7 टक्के व्याजदराने तीन वर्षांसाठी दर महिन्याला 4,512 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. याबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या बजाज डीलरशिपला भेट द्यावी लागेल

बजाज Pulsar N250 मध्ये काय फीचर्स आहेत?

इंडियन टू व्हीलर मार्केटमध्ये बजाज कंपनीची Pulsar ही बाईक सेगमेंट सर्वात जास्त विकली जाणारी बाईक आहे. यामध्ये कंपनीने पावरफुल इंजिन दिलेले असून ती हाय स्पीड बाईक आहे. ही बाईक बजाज कंपनीची स्ट्रीट फायटर स्टायलिश बाईक असून यामध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आलेले आहेत., यामध्ये एलसीडी स्क्रीनवर स्पीडोमीटर, ट्रिपमीटर, फ्युल लेव्हल आणि मायलेज रीडआउट यासह गिअर पोझिशन इंडिकेटर आणि क्लॉक, यूएसबी चार्जिंग पोर्ट, सेमी डिजिटल कन्सोल, एनालॉग पॉड टैकोमीटर, LED लाइटिंग हे फीचर्स उपलब्ध आहेत.

pulsar n250 right front three quarter 5 1

इंजिन – (Pulsar N250)

Pulsar N250 या बाईक मध्ये 249.07 cc इंजन दिलेले असून 24.5 PS पावर आणि 21.5Nm पीक टॉर्क जनरेट करते. Pulsar N250 या बाईकच्या फ्रंट आणि रियर दोन्हीमध्ये डिस्क ब्रेक दिलेले असून ट्यूबलेस टायर आणि सिंगल पीस हँडलबार देण्यात आले आहे. या बाईक मध्ये रायडरच्या सुरक्षेसाठी ड्युल चॅनल एबीएस ABS दिलेले असून 17 इंच अलॉय व्हील आणि 5स्पीड गिअर बॉक्स ट्रान्समिशन उपलब्ध आहे. एवढेच नाही तर स्प्लिट ट्यूबलर फ्रेम टेलिस्कोपिक फोर्क आणि मोनोशॉक सस्पेन्शन सुद्धा Pulsar N250 यामध्ये देण्यात आले आहे.