फक्त 70 रुपयांत घ्या थेटरमध्ये चित्रपट पाहण्याची मजा; कसे ते पहा

टाइम्स मराठी । थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे प्रत्येकाला आवडते. नुकताच लॉन्च झालेला चित्रपट थेटरमध्ये जाऊन पाहण्यात एक वेगळीच मज्जा आहे. जी मजा थेटर मध्ये जाऊन चित्रपट पाहण्यात आहे ती कुठेच नाही. परंतु त्यासाठी टिकटितांच्या किमती सुद्धा अशाच जोरदार असतात. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही थेटर मध्ये जाऊन चित्रपट पाहणे शक्य नसत. पण आता चिंता करू नका. थेटर मध्ये चित्रपट पाहण्याचे शौकीन असणाऱ्या ग्राहकांसाठी PVR INOX ने पासपोर्ट लॉन्च केले आहे. म्हणजेच एका पास वर तुम्ही 10 चिंत्रपट पाहू शकतात. ही ऑफर फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्ये फायदेशीर नसून यूजर साठी देखील अप्रतिम डील आहे. या ऑफरमुळे आता महिन्यांमध्ये पैशांची काळजी न करता थेटर मध्ये चित्रपट पाहता येतील. ही ऑफर 16 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली आहे.

   

जाणून घ्या काय आहे ऑफर

PVR INOX ची ही ऑफर म्हणजे सबस्क्रीप्शन प्लॅन आहे. या सबस्क्रिप्शन प्लानच्या माध्यमातून ग्राहकांना बंपर फायदा होऊ शकतो. आजकाल बॉक्स ऑफिस वर काही चित्रपट कमाल गाजवत आहे. आणि बरेच चित्रपट फ्लॉप देखील होत आहे. त्याचबरोबर या दोन महिन्यांमध्ये बॉक्स ऑफिसवर हिट झालेले चित्रपट पाहण्यासाठी ग्राहकांनी थेटर्स मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे PVR INOX ने सबस्क्रीप्शन प्लॅन किंवा पासपोर्टच्या माध्यमातून ग्राहकांना थेटर्स कडे प्रभावित करण्यासाठी हा प्लॅन लॉन्च केला आहे.

एवढ्या रुपयात मिळेल पासपोर्ट

PVR INOX च्या सबस्क्रीप्शन प्लॅनच्या माध्यमातून 699 रुपये प्रति महिना एवढे पैसे भरून पास घेता येऊ शकतात. यामध्ये ग्राहकांना प्रत्येक महिन्यात 10 चित्रपट पाहता येतील. त्याचबरोबर PVR आयनॉन्स पासपोर्ट हे तीन महिन्यांसाठी व्हॅलिड असतील. ही ऑफर फक्त सोमवार ते गुरुवार पर्यंत उपलब्ध असणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी या ऑफरच्या माध्यमातून चित्रपट पाहता येणार नाही.