Qualcomm ने प्रीमियम मीड रेंज डिव्हाइसेस साठी लॉन्च केला नवीन Snapdragon 7 Gen 3 5G प्रोसेसर

टाइम्स मराठी । अमेरिकन बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन म्हणून ओळखली जाणारी Qualcomm Incorporated कंपनी वायरलेस टेक्नॉलॉजी संबंधित सेमीकंडक्टर आणि सॉफ्टवेअर सेवा प्रदान करत असते. आता Qualcomm ने प्रीमियम मीड रेंज डिव्हाइसेस साठी नवीन Snapdragon 7 Gen 3 5G प्रोसेसर लॉन्च केला आहे. हा नवीन लॉन्च करण्यात आलेला प्रोसेसर पूर्वी उपलब्ध असलेल्या Qualcomm च्या चे Snapdragon 7 Gen 1 पेक्षा बराच अपग्रेटेड आहे. आणि जास्त स्पीड देखील हा प्रोसेसर देतो.

   

Snapdragon 7 Gen 3 5G प्रोसेसर हा 4NM प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी वर आधारित आहे. या प्रोसेसरला SM7550 AB पार्ट नंबरच्या नावाने देखील ओळखला जातो . या प्रोसेसरमध्ये जुन्या मॉडेलपेक्षा 20% ओव्हर ऑल पॉवर एफिशियन्सी मिळते. या प्रोसेसरचा परफॉर्मन्स मागच्या मॉडेल पेक्षा 15% अप्रतिम असल्याचा कंपनीचा दावा आहे. आणि ऑल ओव्हर परफॉर्मन्स 20% इम्प्रुव करण्यात आला आहे. या प्रोसेसर मध्ये HDR गेमिंग सपोर्ट उपलब्ध आहे. जेणेकरून गेमिंग साठी युजर्सला अप्रतिम अनुभव मिळेल. आणि डिवाइस गेमिंग मुळे हिट होणार नाही.

गेमिंग

Snapdragon 7 Gen 3 5G प्रोसेसर प्रोसेसर मध्ये गेमिंग साठी Andreno 644 GPU वापरण्यात आले आहे. जेणेकरून अप्रतिम गेमिंग एक्सपिरीयन्स मिळेल. हा प्रोसेसर KYRO CPU वर काम करत असून त्याचे प्राईम कोर 2.63  GHZ क्लॉक स्पीड टच करतो. याशिवाय 2.4 GHZ च्या 3 कोर देखील यामध्ये उपलब्ध आहे. हा प्रोसेसर snapdragon X63 5G मॉडेम RF सिस्टीमसह येतो. यामध्ये DSDA 5G आणि 4G सपोर्ट मिळतो. याशिवाय  ब्लूटूथ आणि wifi सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

कॅमेरा

Snapdragon 7 Gen 3 5G प्रोसेसर प्रोसेसर मध्ये Spectra ISP चा वापर करण्यात आला आहे. Spectra ISP हे 12 बीट IPS ला सपोर्ट करते. यामध्ये क्वॉलकॉम ने 21 MP ट्रिपल कॅमेरा, 32 MP आणि 21 MP ड्युअल कॅमेरा, 64 MP सिंगल कॅमेरा सपोर्ट उपलब्ध केला आहे. याशिवाय 200 MP फोटो कॅप्चर देखील करता येते. व्हिडिओ साठी यामध्ये 60 FPS वर 4K HDR व्हिडिओ कॅप्चर करण्याची क्षमता आहे.

स्पेसिफिकेशन

या प्रोसेसर मध्ये 168 hz रिफ्रेश रेट वाला WFHD + सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच ट्रिपल फ्रिक्वेन्सी असलेली LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज सपोर्ट उपलब्ध आहे. हे प्रोसेसर ओरा कास्ट च्या माध्यमातून ऑडिओ ब्रॉडकास्ट करू शकतो. हे प्रोसेसर HONOR आणि VIVO या कंपनीच्या मीड रेंज डिवाइस मध्ये लॉन्च करण्यात येऊ शकते.