रेल्वे स्टेशनवरील जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस मधील फरक माहीत आहे का?

टाइम्स मराठी | इंडियन रेल्वे हे जगातील चौथ्या नंबरचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतात रेल्वे स्टेशनची संख्या आतापर्यंत 7,349 एवढी असून दररोज करोडो व्यक्ती प्रवास करत असतात. प्रवास करण्यासाठी आपण बऱ्याचदा रेल्वे हा पर्याय निवडतो. जेणेकरून आपला प्रवास सोईस्कर आणि आरामदायी होईल. रेल्वे प्रवास करत असताना स्टेशन वर तुम्हाला रेल्वे जंक्शन, रेल्वे सेंट्रल आणि रेल्वे टर्मिनल हे तीन शब्द सतत आपल्याला दिसतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का या तिघांचा नेमका अर्थ काय होतो

   

जर आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यांमध्ये रेल्वेने प्रवास करत असू, तर या प्रवासात बरेच छोटे मोठे स्टेशन आपल्याला दिसतात. जसं की गाझियाबाद जंक्शन, कानपूर सेंट्रल, आनंद विहार टर्मिनल. यामध्ये असलेले जंक्शन, टर्मिनल आणि सेंट्रल ही एक स्टेशनची कॅटेगरी आहे.

1) सेंट्रल –

ज्या रेल्वे स्टेशनवर शहराच्या नावानंतर सेंट्रल लिहिलेलं असेल ते शहर सर्वात जुने आणि मेन स्टेशन समजल्या जाते. त्याचबरोबर या सेंट्रल स्टेशनवरून ट्रान्सपोर्ट चे देखील काम केले जाते. म्हणजेच बाकीच्या रेल्वे स्टेशन पेक्षा सेंट्रल स्टेशन वर सर्वात जास्त सेवा उपलब्ध असतात. त्याचबरोबर सेंट्रल स्टेशन हे सर्वात व्यस्त स्टेशन म्हणून ओळखल्या जाते. एवढेच नाही तर या सेंट्रल नाव असलेल्या स्टेशनवर लांब राज्यातून रेल्वे जात येत असतात.

2) जंक्शन-

ज्या रेल्वे स्टेशन वरून दोन किंवा त्यापेक्षा जास्त मार्ग वेगळे होतात, त्याला जंक्शन असं म्हटलं जातं. म्हणजेच रेल्वे एकाच वेळी दोन मार्गाने येऊ किंवा जाऊ शकते. जर एका जंक्शनवर एका रेल्वेसाठी कमीत कमी तीन रस्ते बनवलेले असतील आणि ती रेल्वे येताना तिन्ही पैकी कोणत्याही रूटने जाण्याचा मार्ग निवडत असेल तर त्याला जंक्शन असं म्हटलं जातं. समजा दिल्ली जंक्शन वरून जाताना रेल्वे सब्जी मंडी, सदर बाजार आणि दिल्ली किशनगंज रेल्वे स्टेशन च्या मार्गाने जाते. आणि पुढे जाऊन दुसऱ्या शहरांना मिळते. सर्वात जास्त रूट असलेला जंक्शन म्हणजे मथुरा आहे. या ठिकाणी 7 रूट असून सेलम जंक्शन पासून 6 विजयवाडा आणि बरेली जंक्शन पासून 5 रूट आहेत

3) टर्मिनस –

आता तिसर स्टेशन म्हणजे टर्मिनस …. ज्या रेल्वे स्टेशनच्या पुढे कोणतीच रेल्वे लाईन नाही. त्याला टर्मिनल्स म्हंटल जातं. म्हणजेच या स्टेशनवर पोहोचल्यानंतर रेल्वे त्याच्यापुढे जात नाही. टर्मिनल हे सर्वात शेवटचे स्टेशन वर असते. म्हणजेच टर्मिनल स्टेशनवर येणारी आणि जाणारी रेल्वे ही फक्त एकाच दिशेने जाते. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे याच एक उदाहरण आहे.