आदिलने केली राखीची पोलखोल; म्हणाला, तिने माझे न्यूड….

टाइम्स मराठी | बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्री म्हणून ओळख असलेली बॉलीवूड स्टार राखी सावंत सतत चर्चेत असते. असा एकही दिवस नसतो की ती सोशल मीडियापासून लांब राहील. सोशल मीडियावर तिचे मजेशीर फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत असतात. बऱ्याचदा ती काहीतरी हटके करायचा प्रयत्न करते परंतु तिच्या बोलण्यातून ती स्वतःहून दुसऱ्यांना हसण्यासाठी भाग पाडते. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या बॉयफ्रेंड पासून आणि लग्नामुळे चर्चेत होती. राखी सावंत ने अगोदर लग्न केलं त्यानंतर तिचा नवरा तिला सोडून गेला. त्यानंतर तिने आदिल खान दुर्रानी सोबत लग्न केलं. आणि नंतर नवऱ्याने तिला फसवल्याचा आरोप देखील केला. त्यानंतर काही महिन्यानंतर दोघांनी घटस्फोट घेत असल्यास देखील सांगितलं. आता या कहाणी मध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे.

   

फेब्रुवारी महिन्यामध्ये राखीने पती आदिल खानवर मारहाणीचा आणि फसवणुकीचा आरोप केला होता. त्यानंतर आदिल ला पोलिसांनी अटक केली होती. त्याचबरोबर मैसूर येथील एका तरुणाने देखील तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या दोन्ही प्रकरणामुळे आदिल सहा महिन्यांपासून तुरुंगात होता. आता सहा महिन्यानंतर राखी सावंत चा पती आदिल तुरुंगातून बाहेर आला आहे. जामिनावर सुटलेल्या आदिलने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राखी सावंत वर गंभीर आरोप लावले आहेत.

व्हिडिओ कॉलवर माझे न्यूड व्हिडिओ काढले

पत्रकार परिषदेमध्ये आदिल ने राखी सावंत ची पोलखोल केली आहे. यामुळे राखी सावंत खरी आदिल खरा हा प्रश्न निर्माण होतो. राखी सारखी मुलगी कोणासोबतही काहीही करू शकते. राखी आणि मी व्हिडिओ कॉल वर बोलत असताना माझा न्यूड व्हिडिओ काढल्याचं आदिल ने सांगितलं. त्याचबरोबर आईचा कॅन्सरचा उपचार करायचा आहे असं सांगत प्रत्येक महिन्याला दीड दोन लाख रुपये ती जमा करायची असं देखील त्याने सांगितलं. यासोबतच माझ्या कुटुंबीयांनी तिच्यामुळे खूप काही सहन केल्यास देखील त्याने सांगितलं.

काही महिन्यांपूर्वी राखी प्रेग्नेंट होती. परंतु आदिलमुळे गर्भपात झाल्याचा आरोप देखील तिने आदिल वर लावला होता. यावर आदिल ने सांगितलं की, असं होणं शक्यच नाही कारण तिची एक सर्जरी करण्यात आली होती. राखी सावंत च्या गर्भाशयाला दुखापत झाल्यामुळे ती काढून टाकण्यात आलं होतं. असं देखील त्याने सांगितलं.

आदिल पेक्षा राखी आहे 19 वर्षांनी मोठी

त्याचबरोबर या पत्रकार परिषदेमध्ये आदिल ने राखीने रितेश ला घटस्फोट दिलेला नव्हता हे देखील उघड केलं. यासोबतच राखी आणि आदिल यांच्या वया बद्दल बोलताना तो म्हणाला की, राखी ही माझ्यापासून 19 वर्षांनी मोठी आहे. माझं राखी वर आणि राखी च्या आईवर खूप प्रेम होतं. मला राखीची आई खूप आवडायची. या सर्व आरोपानंतर आदिल दुरानी ने आणखीन एक खुलासा केला आहे. आदिल म्हणाला की, मला राखी ड्रग्स देत होती. त्यामुळे मला नशा चढत होता. आता या सर्व आरोपांनंतर राखी काय प्रतिक्रिया देते हे पाहणं सोयीस्कर ठरेल.