Raksha Bandhan 2023 : यंदाच्या रक्षाबंधनावर भद्राचे सावट? काय आहे शुभ मुहूर्त

टाइम्स मराठी ।श्रावण महिना वेगवेगळे सण (Raksha Bandhan 2023) सोबत घेऊन येत असतो. या सणासुदीच्या काळात सर्वच ठिकाणी उत्साहाचे वातावरण असते. काही दिवसांपूर्वी श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजेच नागपंचमी पार पडला असून आता दुसरा सण रक्षाबंधनची वाट आपण आतुरतेने पाहत आहोत . बहीण भावांमधील नाते दाखवणारा रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मातील लोकप्रिय वार्षिक सण मानला जातो. श्रावण महिन्यातली पौर्णिमा ही पूर्णपणे बहिण भावांच्या नात्यांसाठी रक्षाबंधन म्हणून ओळखली जाते.

   

रक्षाबंधन (Raksha Bandhan 2023) हा सण नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा म्हणून देखील ओळखला जातो. रामायण आणि महाभारतात बहिण भावांच्या गोड नात्यांची बरेच उदाहरणे दिलेली आहेत. हा सण फक्त एका दिवसाचा असला तरी देखील या सणाच्या माध्यमातून बहीण भावाच्या नात्यातील गोडवा दिसून येतो. रक्षाबंधनच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते, आणि भाव सुद्धा बहिणीच्या रक्षणाचे वचन देत असतो.

30 की 31 ऑगस्टला राखी बांधावी?- (Raksha Bandhan 2023)

बहीण भावांचं नातं अतूट करणारा सण आणि श्रावण महिन्याची पौर्णिमा 30 ऑगस्टला सुरू होते तर 31 ऑगस्टला संपते. म्हणून या दिवशी संपूर्ण दिवस राखी बांधता येणार नाही. कारण भद्रकाळ असल्यामुळे या काळात कोणतेही शुभ काम केले जात नाही. त्यामुळे आपल्याला हिंदू दिनदर्शिका नुसारच शुभ वेळेमध्येच राखी बांधावी लागेल. कारण भद्रकाळात कोणतेही शुभ काम केले तर फळाला येत नाही.

काय आहे शुभ मुहूर्त

श्रावण महिन्यातील पौर्णिमा ही 30 ऑगस्टला सकाळी दहा वाजून 58 मिनिटांनी सुरू होणार आहे. आणि ही पौर्णिमा 31 ऑगस्ट 2023 ला सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी संपेल. त्यानुसारच पौर्णिमेच्या तारखेला सकाळी दहा वाजून 58 मिनिटांनी भद्रकाळ सुरू होत आहे. हा काळ रात्री नऊ वाजून एक मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे ३० ऑगस्ट २०२३ ला रात्री ९ वाजून २ मिनिटांनंतर तुम्ही रक्षाबंधन (Raksha Bandhan 2023) साजरी करू शकता किंवा 31 ऑगस्टला साजरी करू शकता. या दिवशी संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल.