Ram Mandir Ayodhya : पंतप्रधान मोदी करणार राम मंदिराचे उद्घाटन; या तारखेला होणार भव्य सोहळा

टाइम्स मराठी । भगवान श्रीरामाची राम जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयोध्या येथे भव्य राम मंदिराचे (Ram Mandir Ayodhya) बांधकाम सध्या सुरू आहे. याच अयोध्या येथील राम मंदिराच्या उदघाटनाबाबत मोठी अपडेट समोर आली असून भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य अशा राम मंदिराचे उदघाटन होईल. अयोध्या मध्ये सुरू असलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

   

5 ऑगस्ट 2020 ला झाले होते भूमिपूजन – Ram Mandir Ayodhya

भगवान श्रीराम हे हिंदू धर्मातील दैवत आहे. अयोध्या ही श्रीराम यांची जन्मभूमी आहे. या जन्मभूमीवर पूर्वी भव्य मंदिर बांधण्यात आलेले होते. त्यानंतर हे मंदिर पाडण्यात आले. सध्या या मंदिराचे आता बांधकाम सुरू असून 22 जानेवारीला मंदिराचे उद्घाटन (Ram Mandir Ayodhya) करण्यात येणार आहे. मागील तीन वर्षांपूर्वी 5 ऑगस्ट 2020 मध्ये या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते. राम मंदिराचे ग्राउंड फ्लोअरचे आणि गर्भगृहाचे काम पूर्ण झाले आहे. राम मंदिराचे काम सुरू असतानाचे बरेच फोटो अयोध्येतून समोर आले आहेत. हे फोटोज श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे जनरल सेक्रेटरी चंपत राय यांनी शेअर केले आहेत.

मोदी करणार उदघाटन –

पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचे उदघाटन (Ram Mandir Ayodhya) करतील. या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या एक आठवड्यापूर्वीपासूनच पूजेला सुरुवात करण्यात येईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 5 सप्टेंबरला याबाबत दिल्लीमध्ये बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी राम मंदिराच्या तयारी बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती दिली.

आयोध्या येथील राम जन्मभूमीच्या अभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या जेवणाची व्यवस्था ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही भोजन व्यवस्था फक्त एक दिवसांची नसून पूर्णपणे एक महिन्यासाठी असेल. जानेवारीमध्ये गर्भगृहात राम लल्लांच्या अभिषेक प्रसंगी ट्रस्टच्या माध्यमातून एक महिना दररोज 75 हजार ते 1 लाख भाविकांना भोजन देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर अयोध्येतील साधू संतांचे म्हणणे आहे की, श्रीराम मंदिराच्या उद्घाटना वेळी साधू आणि भाविकांच्या भोजनाची पूर्ण व्यवस्था मंदिरात करण्यात येईल. त्याचबरोबर निवासी व्यवस्था देखील करण्यात येईल.