Range Rover EV : रेंज रोवर इलेक्ट्रिक कारचा टिजर लॉन्च; 2024 मध्ये बाजारात येणार

Range Rover EV : Range Rover ने  इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये उपलब्ध करण्यात येणार असलेल्या कारचा अधिकृत टीजर लॉन्च केला आहे. आज-काल मोठ्या प्रमाणात  इलेक्ट्रिक वाहन खरेदी आणि विक्री वाढली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. आता लवकरच रेंज रोवर  एक मोठ्या आकाराची SUV कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. त्यापूर्वी कंपनीने या इलेक्ट्रिक कारचा टिजर लॉन्च करत डिझाईन बद्दल खुलासा केला आहे. ही इलेक्ट्रिक कार 2024 च्या मध्यापर्यंत लॉन्च करण्यात येईल. या इलेक्ट्रिक कारमध्ये ऍडव्हान्स सेफ्टी फीचर्स देण्यात येतील. जाणून घेऊया या कारचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

टीझर

कंपनीने लॉन्च केलेल्या टिझरनुसार ही कार वाळू आणि खडबडीत रस्त्यांवर हाय परफॉर्मन्स देईल. कंपनीने सध्या तरी या इलेक्ट्रिक कारच्या (Range Rover EV) किमती, इंजिन आणि लॉन्चिंग डेट बद्दल खुलासा केला नसून 2024 मध्ये ही कार लॉन्च होण्याची शक्यता आहे. यासोबतच कार मध्ये एलिट लुक, अप्रतिम फीचर्स देण्यात येऊ शकतात. टीझर नुसार, रेंज रोवर इलेक्ट्रिक कार मध्ये मोठे टायर देण्यात आले आहे. या टायरवर ईव्ही बॅजिंग उपलब्ध आहे. ही कार फ्लेक्झिबल मॉड्युलर लॉजिट्युनल आर्टिकल प्लॅटफॉर्मवर डेव्हलप करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी, वाळू, डोंगर यासारख्या सर्व ठिकाणी ही कार धावण्यास सक्षम आहे. या कारमध्ये अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर मिळतील. या कारच्या पुढच्या साईडने चार्जिंग पॉइंट देण्यात येईल.

पावरट्रेन- Range Rover EV

सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या रेंज रोव्हर कार मध्ये 4.4 लिटर ट्विन टर्बो इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 615 ps हाय पावर आणि 750 nm पीक टॉर्क जनरेट करते. त्यानुसार अपकमिंग रेंज रोवर मध्ये 107.8 kwh बॅटरी पॅक देण्यात येऊ शकते. या बॅटरी पॅक सोबतच सिंगल आणि ड्युअल मोटर दोन्ही पर्याय उपलब्ध होतील. त्यानुसार सिंगल मोटर 360 ps पावर आणि 598 nm पीक टॉर्क जनरेट करेल. ही इलेक्ट्रिक कार एकदा चार्ज केल्यानंतर 613 किलोमीटर पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते.

फीचर्स

या अपकमिंग रेंज रोवर मध्ये (Range Rover EV) एलिट लुक बघायला मिळू शकतो. यासोबतच 12.3 इंच डिजिटल डिस्प्ले, मल्टी झोन क्लायमेट कंट्रोल, सेफ्टी साठी 6 एअर बॅग, पार्किंग असिस्ट  यासारखे फीचर्स या अपकमिंग इलेक्ट्रिक कार मध्ये मिळू शकतात. ही कार लॉन्च झाल्यावर BMW ix, Audi Q8 e tron, Mercedes Benz EQS SUV या कार सोबत प्रतिस्पर्धा करेल.