Ola आणि Uber ला टक्कर देण्यासाठी Rapido ने सुरू केली कॅब सर्विस  

टाइम्स मराठी । भारतातील प्रमुख शहरात आरामदायी प्रवास करण्यासाठी आणि एखाद्या ठिकाणी वेळेवर पोहोचायचे असेल तर कॅब सर्विसेस उत्तम ऑप्शन आहे. या कॅब सर्विस देणाऱ्या  कंपन्यांपैकी OLA आणि UBER कंपन्या नावारूपास आलेल्या आहेत. आता OLA आणि UBER या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Rapido कंपनीने देखील कॅब सर्विस सुरू केली आहे. आता पर्यंत रॅपिडोच्या माध्यमातून बाईक आणि ऑटो सर्विस उपलब्ध होती. आता Rapido फोर व्हीलर सेगमेंट मध्ये पाऊल ठेवत आहे. यासाठी कंपनीने सुरुवातीला एक लाख फ्लीट सुरू केले आहे. काही काळानंतर कंपनी या फ्लिट्स चा विस्तार करेल.

   

पहिल्या सत्रामध्ये Rapido कंपनीने ही कॅब सर्विस काही शहरांसाठी सुरू केली आहे. यामध्ये दिल्ली, हैदराबाद आणि बेंगलोर यांचा समावेश आहे. लवकरच ही सर्विस सर्व ठिकाणी सुरू करण्यात येईल. Rapido कॅब सर्विस ही बाकीच्या प्रतिस्पर्धी पेक्षा स्वस्त असेल. सध्या Rapido बाईक सर्विसेस साठी खास ऑफर देत आहे. या ऑफर्स मुळे भारतातील प्रमुख शहरांमधील रहिवाशांकडून Rapido ला चांगला प्रतिसाद मिळतो.

मालवाहतूक करणारी व्हॅन देखील उपलब्ध करण्यात येणार

सर्वात पहिले Rapido बाईक टॅक्सी सर्विसेस साठी उपलब्ध करण्यात आली होती. कंपनीने ग्राहकांना दिलेली सर्वात पहिली सर्विस म्हणजे ऑटो आहे. आता यानंतर कॅब सर्विस देखील यामध्ये सामील झाली आहे. यानंतर Rapido च्या माध्यमातून बॉर्डर ॲप प्रमाणे टाटा ऐस गोल्ड म्हणजेच छोटा हत्ती आणि मालवाहतूक करणारी व्हॅन सर्विसेस मध्ये जोडण्यात येणार आहे. आपले ग्राहक वाढवण्यासाठी Rapido सर्विसेस मध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध करत आहे.

कमी दरात देणार सर्विस

Rapido कंपनीची कॅब सर्विस पूर्णपणे वेगळी असणार आहे. त्यानुसार कंपनी कमी दरामध्ये सर्विस देणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. यासोबतच कंपनीने चालकांसाठी शून्य कमिशन मॉडेल आणले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, सध्या  RAPIDO कॅब सर्विस च्या माध्यमातून कॅब बुक करताना बराच वेळ लागत आहे. परंतु लवकरच हा प्रॉब्लेम देखील मिटवण्यात येणार असल्याचं कंपनीने सांगितलं.

सबस्क्रीप्शन फीस बेस्ड मॉडेल लागू केले

ड्रायव्हर आणि ग्राहकांना जोडण्यासाठी SAAS आधारित प्लॅटफॉर्म एक अप्रतिम मीडिएटर आहे. RAPIDO कंपनीने देशाभरात 1 लाख कार्स सह कॅब सर्विस सुरू केली आहे.  OLA आणि UBER सर्विसेस कमिशन बेस्ड मॉडेल वर काम करतात. त्यामुळे ड्रायव्हर्सच्या सतत तक्रारी येत असतात. म्हणून RAPIDO ने सबस्क्रीप्शन फीस बेस्ड मॉडेल लागू केले आहे. त्यानुसार ड्रायव्हरला ग्राहकांकडून मिळालेले पूर्ण पेमेंट मिळेल. आणि त्यांना कंपनीला कमिशन द्यावे लागणार नाही.