नाद खुळा!! बाजारात आली पारदर्शक Electric Bike; 15 मिनिटात चार्ज, 150 KM रेंज

टाइम्स मराठी । भारतात गेल्या वर्षभरात इलेक्ट्रिक गाड्यांचे मार्केट चांगलंच वाढलं आहे. पेट्रोलची झंझट नसल्याने अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. वाढती मागणी पाहून गेल्या वर्षभरात अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आणि ग्राहकांची मोठी पसंती सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्याच पार्श्वभूमीवर आता चेन्नई-येथील इलेक्ट्रिक वाहन (EV) स्टार्टअप Raptee Energy ने तामिळनाडूतील ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट (GIM) मध्ये पारदर्शक बॉडीसह येणारी इलेक्ट्रिक मोटरसायकल सादर केली आहे. अतिशय हटके लूक असणारी ही इलेक्ट्रिक स्कुटर पाहताच तुमची बोटे तोंडात जातील.

   

कसा आहे Raptee इलेक्ट्रिक बाईकचा लूक –

Raptee ची ही इलेक्ट्रिक बाईक बघता क्षणीच तुमच्या मनात भरेल. ही बाईक पूर्णपणे पारदर्शक असल्याने आतील सर्व मेकॅनिझम तुम्हाला बाहेरूनच दिसेल. ही बाईक स्पोर्टी लुक आणि डिझाइनने सुसज्ज आहे. ही इलेक्ट्रिक मोटरसायकल यावर्षी एप्रिलमध्ये लॉन्च केली जाईल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

150 KM रेंज-

कंपनीचा दावा आहे कि, एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक बाईक 150 किलोमीटर पर्यंत अंतर पार करेल. यावेळी तिचे टॉप स्पीड 135 किमी प्रतितास इतकं राहील आणि अवघ्या 3.5 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास स्पीड वाढवण्यास सक्षम आहे. ही इलेक्ट्रिक बाईक CCS2 स्टेशनवर चार्जिंग करायची म्हंटल तर 40 किमी पर्यंतच्या रेंजसाठी 15 मिनिटे चार्ज करावी लागेल.

Raptee कंपनीने 4 एकर जागेत 85 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून चेन्नईमध्ये पहिला कारखाना सुरू केला आहे. हे आधुनिक R&D सेंटर दरवर्षी 1 लाख युनिट्सचे उत्पादन करेल आणि पुढील 24 महिन्यांसाठी Raptee चे मुख्य उत्पादन केंद्र म्हणून काम करेल. या कारखान्यात जवळपास 470 कामगारांना नोकरी मिळेल असं कंपनीने म्हंटल आहे.