Rashi Bhavishya : 1 ऑक्टोंबरपासून या 5 राशींचे भाग्य उजळणार; पहा तुमचेही नशीब फळफळणार का?

टाइम्स मराठी । वैदिक शास्त्रानुसार राशींचे (Rashi Bhavishya) एकूण बारा प्रकार असतात. या शास्त्रानुसार कोणत्याही ग्रहांच्या राशींच्या बदलाचा प्रभाव हा सर्व राशींच्या व्यक्तींवर पडत असतो. हा प्रभाव कधी शुभ तर कधी अशुभ दोन्ही प्रकारे दिसून येतो. बऱ्याचदा एखाद्या ग्रहाचा प्रभाव राशींवर पडण्यास त्या राशीतील व्यक्ती मालामाल होतात. आणि बराच राशीतील व्यक्तींना याचा त्रास देखील सहन करावा लागतो. त्यानुसार आता 1 ऑक्टोबर पासून खाली दिलेल्या 5 राशींचे भाग्य उजळणार आहे. 1 ऑक्टोंबर पासून बुध सिंह राशीतून कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. बुध राशी परिवर्तन करणार असल्यामुळे काही राशींवर त्याचा जबरदस्त परिणाम पडू शकतो. आणि काही राशींच्या व्यक्तींना त्याचा लाभ होऊ शकतो. जाणून घेऊया बुध चा कन्या राशि मध्ये प्रवेश केल्यास कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

   

१) वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींवर बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव दिसणार आहे. त्यामुळे वृषभ राशींच्या व्यक्तींना कामामध्ये यश मिळेल. त्याचबरोबर कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन सुखमय जाईल. या काळामध्ये धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे. यासोबतच धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी या काळामध्ये मिळू शकतो.

२) सिंह– Rashi Bhavishya

सिंह राशीतून कन्या राशी मध्ये बुध ग्रहांनी राशी परिवर्तन केल्यानंतर सिंह राशीतील व्यक्तींवर चांगला प्रभाव दिसून येईल. या काळात या राशींचे लोक आर्थिक दृष्ट्या सक्षम बनतील. त्यांच्या संपत्तीमध्ये देखील वाढ होऊ शकते. सिंह राशीतील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ एखाद्या वरदान पेक्षा कमी नाही. तुम्ही केलेल्या कार्याची प्रशंसा या काळामध्ये होऊ शकते. तसेच व्यवसाय करण्यासाठी देखील हा काळ शुभ आहे.

३) कन्या

बुध ग्रहाने कन्या राशी मध्ये प्रवेश केल्यानंतर कन्या राशींतील व्यक्तींचे आरोग्य सुधारेल. त्याचबरोबर कन्या राशीतील व्यक्ती जीवनसाथी सोबत जास्त वेळ घालवू शकतील. कन्या राशीतील व्यक्ती जर व्यवसाय करण्याचा विचार करत असेल तर व्यवसायासाठी हा काळ शुभ आहे. तुम्ही करत असलेले कार्य यशस्वी होईल. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा चान्स मिळेल. त्याचबरोबर कन्या राशीतील व्यक्तींना मानसन्मान पद प्रतिष्ठा मिळेल.

४) मकर

बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे मकर राशीतील व्यक्तींचे भाग्य (Rashi Bhavishya) या काळामध्ये पूर्ण साथ देईल. मकर राशीतील व्यक्तींसाठी हा काळ वरदान पेक्षा काही कमी नाही. मकर राशींच्या व्यक्तींना शत्रूंपासून मुक्ती मिळेल. त्याचबरोबर या मकर राशीतील व्यक्तींवर लक्ष्मी मातेची खास कृपा असेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये त्यांना यश मिळेल.

५) कुंभ राशी

कुंभ राशीतील व्यक्तींवर या काळात चांगला प्रभाव दिसून येईल. कुंभ राशींच्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण आणि डिग्री मिळेल. वाणी व्यवसायासोबत जोडल्या गेलेल्या व्यक्तींना प्रचंड लाभ होईल. कौटुंबिक सुख लाभेल. या काळामध्ये कुंभ राशींचे व्यक्ती घर किंवा वाहन घेण्याचे सुख उपभोगू शकतात. बौद्धिक क्षमता आणि लेखन शक्तीमध्ये वाढ होईल. त्याचबरोबर कुंभ राशींच्या व्यक्तींना संतान संबंधित थोडीफार चिंता कमी होईल.