Rashi Bhavishya : नोव्हेंबर महिन्यामध्ये ‘या’ राशींच्या व्यक्तींचे नशीब चमकणार

टाइम्स मराठी । आज पासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिना हा काही राशींसाठी (Rashi Bhavishya) फायदेशीर ठरणार आहे. कारण या राशींच्या लोकांवर नोव्हेंबर महिन्यात माता लक्ष्मीची खास कृपा असणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्र हा ग्रह कन्या राशी मध्ये विराजमान होणार आहे. आणि शनिदेव मार्गी होणार आहेत. यासोबतच  शनिदेव राशी परिवर्तन करून कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. एवढेच नाही तर नोव्हेंबर महिन्यात चंमा मेष राशीमध्ये प्रवेश करेल. मेष राशी मध्ये अगोदरपासूनच गुरु स्थित आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात गजकेसरी योग आणि शशयोग निर्माण होत आहेत. या दोन्ही राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना शुभ लाभ होऊ शकतो. जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी.

   

१) मिथुन (Gemini)-

मिथुन राशींच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिना हा शुभ ठरू शकतो. मिथुन राशींच्या व्यक्तींना काही समस्यांकडे दुर्लक्ष करत करियर आणि व्यवसायामध्ये फायदा होईल. मिथुन राशींच्या व्यक्तींचा या काळामध्ये मानसन्मान वाढू शकतो. व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. यासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या व्यक्तींना हमखास यश मिळू शकते. मिथुन राशींच्या व्यक्तींना मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार महिलांच्या कामांची प्रशंसा देखील या काळामध्ये होऊ शकते.

२) कर्क- (Rashi Bhavishya)

कर्क राशींच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिना खास जाणार आहे. या महिन्यांमध्ये नशिबाची साथ पूर्णपणे मिळेल. कर्क राशीतील व्यक्तींची रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्क राशींच्या व्यक्तींना यश मिळू शकते. कर्क राशींचे व्यक्ती कोणत्याही व्यवसायामध्ये यंदा गुंतवणूक करण्याचा विचार करत असतील तर त्यातून नफा मिळण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ देखील घालवू शकतात. कर्क राशींच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद नांदू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना यश मिळेल.

३) मकर (Capricorn)-

मकर राशींच्या (Rashi Bhavishya) व्यक्तींना या काळामध्ये कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवण्याचा चान्स मिळेल. मकर राशींच्या व्यक्तींची नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होण्याची शक्यता आहे. यासोबतच करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. मकर राशीच्या व्यक्तींची प्रलंबित कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत देखील निर्माण होतील.