Rashi Bhavishya : महानवमीपासून पुढील 7 दिवस या राशींच्या व्यक्तींना येणार चांगले दिवस; बक्कळ धनलाभ होण्याची शक्यता

टाइम्स मराठी । सर्व ठिकाणी नवरात्रीच्या निमित्ताने जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे. या महिन्यामध्ये नवरात्रीच्या निमित्ताने बरेच योग जुळून आल्यामुळे नवरात्रोत्सव हा सर्वांसाठी सुखदायी आणि समाधानी ठरला. यासोबतच आता ऑक्टोबर महिन्यातला हा चौथा आठवडा खास ठरणार आहे. कारण या आठवड्यामध्ये महानवमी आणि दसरा साजरा करण्यात येणार असून 28 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येईल. यासोबतच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शेवटचे चंद्रग्रहणही पाहायला मिळेल. यामुळे या काळामध्ये काही राशींच्या व्यक्तींना (Rashi bhavishya) प्रचंड फायदा होणार आहे. यासोबतच देवीच्या कृपेने या व्यक्तींना बक्कळ धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे.

   

१) वृषभ-

वृषभ राशींच्या व्यक्तींना या काळामध्ये पैसा आणि करिअरच्या बाबतीत चांगला लाभ होऊ शकतो. या सोबतच धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायात देखील फायदा होऊ शकतो. आणि प्रगती देखील होऊ शकते. वृषभ राशींच्या व्यक्तींना करिअरमध्ये नवीन सुरुवात करण्यासाठी ही चांगली संधी आहे.

२) मिथुन-

मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अप्रतिम जाणार आहे. इथून पुढे या राशींच्या व्यक्तींच्या परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होऊ शकते. यासोबतच मिथुन राशीतील व्यक्तींचे अडकलेले पैसे मिळू शकतात. ज्यामुळे कर्ज संपू शकते. मात्र या काळात मिथुन राशींच्या व्यक्तींनी वाहन चालवताना आणि आरोग्य संदर्भात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

३) वृश्चिक-

ऑक्टोबर महिन्यातील चौथ्या आठवड्यामध्ये वृश्चिक राशींचे स्थान परिवर्तन होण्याची शक्यता आहे. यासोबतच वृश्चिक राशींचे व्यक्ती त्यांच्या करिअर बाबत मोठा निर्णय या काळात घेऊ शकतात. नवीन काम सुरू करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ चांगला ठरणार आहे. यासोबतच वृश्चिक राशींच्या व्यक्तींना या काळामध्ये आर्थिक लाभ देखील होऊ शकतो.

४) कुंभ-

या आठवड्यामध्ये कुंभ राशीतील व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. भविष्यासाठी काही योजना आखण्यासाठी हा चांगला काळ असून कुंभ राशीतील व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरू शकते. या काळामध्ये नातेसंबंध घट्ट होऊ शकतात. कुंभ राशींच्या व्यक्तींना या काळामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू शकते.

५) मीन-

मीन राशींच्या व्यक्तींचा आठवडा सुरुवातीला प्रलंबित कामे पूर्ण करण्याकडे असेल.  ही अडकलेली काम पूर्ण केल्यामुळे या व्यक्तींना मोठा दिलासा मिळू शकतो. मीन राशींच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती या काळात चांगली राहू शकते. त्याचबरोबर पैसा कमावण्यासाठी आणि करिअरमध्ये प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होऊ शकतात. मीन राशींतील व्यक्तींना शैक्षणिक स्पर्धेमध्ये यश मिळू शकते.