Rashi Bhavishya । ज्योतिष शास्त्रानुसार यावर्षी धनतेरसच्या मुहूर्तावर शुभ योग बनत आहे. हिंदू धर्मामध्ये धनतेरसचे एक खास महत्व आहे. या दिवशी सोने चांदी सोबतच काही गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते. यंदाच्या धनतेरसला 59 वर्षानंतर दुर्मिळ योग जुळून येत आहे. यासोबतच या दिवाळीला बऱ्याच ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल झाले असून 59 वर्षानंतर हा शुभ योग जुळून आला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार बारा राशींपैकी काही राशींवर ग्रह परिवर्तन किंवा दुर्मिळ योग जुळून आल्यानंतर चांगला प्रभाव पडत असतो. बऱ्याचदा काही राशींवर वाईट प्रभाव देखील दिसून येतो. त्याच प्रकारे 59 वर्षानंतर जुळून आलेल्या दुर्मिळ योगामुळे काही राशींवर चांगला प्रभाव पडणार आहे.
सध्या गुरु हा मेष राशी मध्ये विराजमान आहे. तर शुक्र हा कन्या राशी मध्ये असून तुला राशीमध्ये ग्रहांचा राजा सूर्य विराजमान आहे. याशिवाय शनिदेव देखील कुंभ राशि मध्ये तीन वर्षानंतर विराजमान झाले आहे. यामुळे शश योग निर्माण होत आहे. यासोबतच गुरु ग्रह सहाव्या दृष्टीने सूर्यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे धनतेरसला एक खास योग जुळून येत असून काही राशींच्या व्यक्तींना अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. यासोबतच बिझनेस आणि व्यापारांमध्ये वृद्धी होऊ शकते. जाणून घेऊया कोणत्या राशींना होणार आहे धनलाभ.
मेष- Rashi Bhavishya
मेष राशी मध्ये गुरु विराजमान असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना खास लाभ होऊ शकतो. मेष राशींच्या व्यक्तींचे खोळंबलेली कामे या काळामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. मेष राशींचे व्यक्ती या काळात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये देखील सुख-समृद्धी लाभेल. मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या काळात चांगले राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक लाभ होऊ शकतो. यासोबतच व्यवसायामध्ये देखील चांगला फायदा दिसून येईल.
मिथुन
मिथुन राशींच्या (Rashi Bhavishya) व्यक्तींना धनतेरस निमित्त चांगला लाभ होणार आहे. धनतेरस च्या निमित्ताने मिथुन राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळेल. या काळात बऱ्याच काळापासून थांबलेली कामे पूर्ण होऊ शकतील. यासोबतच धनसंपदा देखील प्राप्त होईल. मिथुन राशींच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील. समाजात या व्यक्तींचा मान सन्मान वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. यासोबतच इन्क्रिमेंट देखील होऊ शकते. व्यक्ती जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर चांगला योग आहे. यामुळे भविष्यामध्ये मोठा लाभ होऊ शकतो.
मकर
मकर राशींच्या व्यक्तींना या काळामध्ये मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते. यासोबतच मकर राशींच्या व्यक्तींवर ऑफिस मध्ये मोठ्या जबाबदाऱ्या देखील येऊ शकतात. मकर राशींच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती सुधारू शकते. यासोबतच कमाई चे नवीन स्रोत मकर राशींच्या व्यक्तींसाठी खुले होतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना मोठी डील मिळू शकते. मकर राशींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील. परिवारासोबत चांगला वेळ घालवू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये देखील सुख-समृद्धी लाभेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची किस्मत या काळात चमकू शकते. याशिवाय नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना यश मिळू शकते.