Rashi Bhavishya : 400 वर्षांनंतर जुळून आलेत 9 दुर्मिळ योग; या 3 राशीच्या व्यक्तींना होणार फायदा

टाइम्स मराठी । यंदा सर्व ठिकाणी नवरात्र धुमधडाक्यात साजरी करण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी जल्लोष उत्साहाचे वातावरण दिसत असून यंदाचा नवरात्र उत्सव आणि दिवाळी हे खऱ्या अर्थाने लक्ष्मीचा स्वागत करत आहेत. कारण या नवरात्रीमध्ये तब्बल 400 वर्षांनंतर 9 दुर्मिळ योग (Rashi Bhavishya) तयार झाले आहेत. नवरात्र सुरू झाल्यापासून वेगवेगळे योग सुरू झाले असून हे पूर्णपणे 9 योग काही राशीतील व्यक्तींसाठी वरदान ठरत आहे. यासोबतच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर देखील अमृत काल आणि वृद्धी योग सुरू होणार आहे. म्हणजेच यंदाचा दसरा देखील दुर्मिळ ठरेल. या योगाचा शुभ परिणाम 3 राशीतील लोकांना वरदान ठरेल. जाणून घेऊया या 3 राशी कोणत्या आहेत.

   

कोणत्या दिवशी कोणता योग?

15 ऑक्टोबरला पद्म आणि बुधदित्य योग जुळून आला होता. त्यानंतर 16 ऑक्टोबरला स्वाती नक्षत्र आणि भद्रा तिथीचा छत्र योगही जुळून आला होता. त्यानंतर 17 ऑक्टोबरला प्रीती, आयुष्मान श्रीवत्स योग आणि 18 ऑक्टोबरला सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृतसिद्धी योग जुळून आला होता. त्यानंतर 19 ऑक्टोबरला बुध गोचर मुळे तूळ राशीमध्ये चतुरग्रही योग आणि 20 ऑक्टोबरला षष्ठीतिथी आणि मूल नक्षत्राचा रवि योग सुरू झाला आहे. आता उद्या म्हणजेच 21 ऑक्टोबरला त्रीपुष्कर योग आणि 22 ऑक्टोबरला सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग जुळून येणार आहे. यानंतर 23 ऑक्टोबरला सर्वात सिद्धी आणि रवी योग जुळुन येणार आहे.

मेष- Rashi Bhavishya

मेष राशींच्या व्यक्तींवर या नऊ दुर्मिळ योगामुळे चांगला प्रभाव दिसून येणार आहे. मेष राशींच्या व्यक्तींना हे योग वरदान ठरणार असून त्यांचे आयुष्य आनंददायी जाऊ शकते. मेष राशींचे व्यक्ती जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवू शकतात. या काळामध्ये नोकरदार वर्गाला आनंदाची बातमी मिळू शकते. त्याचबरोबर या व्यक्तींना कामाचा मोबदला मिळणार असून उच्च पद देण्यात येईल. मेष राशींच्या व्यक्तींच्या विवाहित जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. ज्या व्यक्तींनी काही दिवसांपूर्वी गुंतवणूक केली असेल त्यांना आता या काळात फायदा होऊ शकतो. हे नव दुर्मिळ योग मेष राशींच्या व्यक्तींसाठी अप्रतिम ठरणार असून या राशीतील व्यक्तींना यश प्राप्त होईल.

धनु

धनु राशीतील व्यक्तींना नऊ दुर्मिळ योग (Rashi Bhavishya) हे भाग्यशाली ठरणार आहेत. या काळामध्ये धनु राशीतील व्यक्तींचे कामे मार्गी लागतील. हा काळ या राशीतील व्यक्तींसाठी सुवर्णकाळ ठरेल. कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या व्यक्तींना प्रगती लाभेल. या काळामध्ये नवीन गाडी आणि मालमत्ता खरेदी करण्याचा शुभ योग आहे. धनु राशीतील व्यक्तींना अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. व्यवसायामध्ये देखील मोठा करार होण्याची शक्यता आहे.  या दुर्मिळ योगामुळे धनु राशींतील लोकांना चांगला फायदा होऊ शकतो.

मकर

नवरात्र उत्सवात आलेल्या या दुर्मिळ नऊ योगामुळे मकर राशीतील व्यक्तींना प्रचंड फायदा होणार आहे. या काळामध्ये मकर राशींच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मकर राशीतील व्यक्ती नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असतील तर हा शुभ योग आहे. मकर राशीच्या व्यक्ती वर नवीन जबाबदाऱ्या देखील पडणार आहेत. या काळामध्ये भरपूर पैसा देखील मिळू शकतो. स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील यश मिळेल.