Rashi Bhavishya : 17 नोव्हेंबरला मंगळ आणि सूर्य देवांची युती; या राशीला होईल आर्थिक लाभ

टाइम्स मराठी । ग्रहांची युती आणि राशी परिवर्तन (Rashi Bhavishya) याचा संपूर्ण परिणाम हा मानवी जीवनावर आणि राशींवर होत असतो. हा परिणाम काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ पडत असतो. परंतु यंदा दिवाळी निमित्त बरेच शुभ योग जुळून आल्याने बऱ्याच राशींना धनलाभ होणार आहे. आता 17 नोव्हेंबरला सूर्य आणि मंगळ या दोन्ही ग्रहांची युती वृश्चिक राशी मध्ये होणार आहे. सध्या मंगळदेव हे वृश्चिक राशी मध्ये असून 17 नोव्हेंबर रोजी सूर्यदेव वृश्चिक राशी मध्ये प्रवेश करणार आहे. एका वर्षानंतर मंगळ आणि सूर्यदेव एकत्र येत असल्यामुळे त्याचा परिणाम सर्व राशींवर दिसेल. त्यापैकी या तीन राशींचे चांगले दिवस सुरू होणार आहे. म्हणजेच मंगळ आणि सूर्यदेव एकत्र आल्याचा प्रभाव तीन राशींच्या व्यक्तींसाठी चांगला असेल. जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी.

   

१) तूळ

मंगळ आणि सूर्यदेव या दोघांची युती होणार असून तूळ राशींच्या व्यक्तींना या युतीचा फायदा होणार आहे. या काळामध्ये तूळ राशींच्या व्यक्तींना धन प्राप्ती होऊ शकते. याशिवाय तूळ राशींच्या व्यक्तींची (Rashi Bhavishya) आर्थिक स्थिती देखील चांगली राहील. तूळ राशींच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व आकर्षक असल्यामुळे या व्यक्तींसोबत बरेच जण जोडले जातील. काही व्यवसायिकांचा अडकलेला पैसा या काळात परत मिळू शकतो. या काळामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. राशींच्या व्यक्तींचे आरोग्य देखील चांगले राहण्याची शक्यता आहे.

२) कर्क (Rashi Bhavishya)

सूर्य आणि मंगळ  या दोघांची युती कर्क राशीसाठी अप्रतिम ठरू शकते. या काळामध्ये युती कर्क राशीच्या  गोचर कुंडलीच्या पाचव्या स्थानी असणार आहे. ज्यामुळे युतीचा फायदा कर्क राशीतील व्यक्तींना होईल. कर्क राशींच्या व्यक्तींना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते. विद्यार्थ्यांना देखील चांगला लाभ होऊ शकतो. आई वडिलांना मुलांसंबंधी चांगली बातमी मिळेल. कर्क राशींच्या व्यक्तींना अनपेक्षित आर्थिक लाभ देखील होण्याची शक्यता आहे.

3) वृषभ

मंगळ आणि सूर्य या दोघांची युती  वृषभ राशीतील व्यक्तींना अनुकूल ठरेल. कारण वृषभ राशींच्या व्यक्तींच्या सातव्या स्थानी ही युती तयार होणार आहे. यामुळे वृषभ राशींच्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. वृषभ राशींच्या व्यक्तींना जोडीदाराचे सहकार्य मिळेल. याशिवाय आयुष्यामध्ये आनंद येऊ शकतो. वृषभ राशींच्या (Rashi Bhavishya) व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळामध्ये गुंतवणूक केल्यास मोठा लाभ होऊ शकतो. व्यावसायिकांना देखील अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ राशींच्या नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.