Rashi Bhavishya : 11 डिसेंबरला निर्माण होत आहे चंद्र- मंगळ योग; या 3 राशींना होईल फायदा  

टाइम्स मराठी । सर्व ग्रहांमध्ये सर्वात वेगात चालणारा ग्रह म्हणून चंद्र ओळखला जातो. चंद्र हा ग्रह कोणत्याही राशीमध्ये (Rashi Bhavishya) अडीच दिवसांपेक्षा जास्त राहत नाही. चंद्र हा ग्रह लगेच राशी बदल करतो. कुंडली मध्ये असलेल्या चंद्राच्या स्थितीचा मानवी जीवनावर बराच प्रभाव पडताना दिसून येतो. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला विशेष महत्त्व दिले आहे. आता येत्या 11 डिसेंबरला सकाळी 6.11 मिनिटांनी चंद्र हा वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सध्या वृश्चिक राशी मध्ये मंगळ हा ग्रह असून चंद्राच्या प्रवेशामुळे चंद्रमंगळ योग तयार होत आहे. चंद्र मंगळ या योगाचा फायदा आता बऱ्याच राशींच्या होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी….

   

१) मिथुन-

चंद्र मंगळ योग हा मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी पैसे कमवण्याचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. या व्यक्तींना वेगवेगळ्या कामांमध्ये यश मिळेल. मिथुन राशींच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. या व्यक्तींना मुलांकडून सकारात्मक बातमी मिळू शकते. मिथुन राशीतील  नोकरदार व्यक्तींना करिअरच्या दृष्टीने बरेच सुवर्णसंधी चालून येतील. वैवाहिक जीवनामध्ये पूर्वीपेक्षा जास्त आनंद मिळेल. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळेल.

 २) सिंह – Rashi Bhavishya

सिंह राशींच्या व्यक्तींना तयार होत असलेल्या चंद्र मंगळ योगाचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. या काळामध्ये सिंह राशींच्या व्यक्तींना अनपेक्षित पद्धतीने पैसे मिळू शकतात. यासोबतच उपजीविकेच्या साधनांमध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे. करियर आणि व्यवसायामध्ये अनपेक्षित प्रगती मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना इच्छित ठिकाणी पदोन्नती आणि बदली मिळू शकते. सिंह राशींच्या व्यक्तींना या काळात आर्थिक बाबीत खूप फायदा होईल.

 ३) वृश्चिक –

 वृश्चिक राशीमध्ये (Rashi Bhavishya) चंद्र आणि मंगळ ग्रह एकत्र आल्यामुळे  चंद्र मंगळ योग तयार होत आहे. यामुळे वृश्चिक राशींच्या व्यक्तींच्या उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ होईल. या काळात व्यवसायिकांना मोठा फायदा होईल. अनपेक्षित पणे पैसे कमवण्याच्या संधी देखील चालून येतील. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. पैशांची बचत करण्यामध्ये हे व्यक्ती यशस्वी होतील. आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.