टाइम्स मराठी । ज्योतिष शास्त्रानुसार राशींचे (Rashi Bhavishya) बारा प्रकार पडतात. या 12 राशींचे ग्रह हे त्यांची जागा बदलत असतात. या राशी परिवर्तनाचा चांगला वाईट प्रभाव हा काही राशींवर दिसत असतो. आज राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांचे संक्रमण होणार आहे. राहू हा प्रभावशाली ग्रह असल्याचे मानले जाते. या ग्रहामुळे बऱ्याचदा संकटांचा सामना करावा लागतो. तर बऱ्याचदा राहू हा ग्रह शुभ संकेत देखील देतो. आज होणाऱ्या राशी परिवर्तनात राहू ग्रह हा मेष राशी मधून बाहेर पडून मीन राशीमध्ये प्रवेश करेल. आणि केतू हा ग्रह तूळ राशी मधून कन्या राशि मध्ये प्रवेश करेल. यामुळे काही राशींवर (Rashi Bhavishya) याचा शुभ परिणाम दिसून येऊ शकतो. जाणून घेऊया या काळामध्ये कोणत्या राशींवर शुभ प्रभाव दिसून येईल.
1) मिथुन (Gemini)-
राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांचे आज संक्रमण होणार असल्यामुळे मिथुन राशींच्या व्यक्तींचा हा शुभ दिवस असू शकतो. या काळामध्ये मिथुन राशींच्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळू शकते. या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. या काळात मिथुन राशींच्या व्यक्तींच्या आर्थिक अडचणी दूर होतील. मिथुन राशींच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी लाभेल. राहूचा मिथुन राशींच्या व्यक्तींवर शुभ प्रभाव दिसून येईल.
2) कर्क (Cancer)- Rashi Bhavishya
कर्क राशींच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. त्याचबरोबर कर्क राशीतील काही व्यक्तींच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. या राशीतील व्यक्तींना पद प्रभाव आणि प्रतिष्ठा यांचा लाभ होऊ शकतो. कर्क राशींच्या व्यक्तींना प्रवासाचे योग आहेत. त्याच बरोबर या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
3)कन्या (Virgo)-
बारा राशींपैकी एक म्हणजे कन्या रास. कन्या राशींच्या व्यक्तींना राहू आणि केतू या ग्रहांच्या संक्रमणामुळे शुभ लाभ (Rashi Bhavishya) होऊ शकतो. त्याचबरोबर या व्यक्तींना संपत्ती मिळण्याचे चान्सेस आहेत. कन्या राशीतील व्यक्तींना बऱ्याच मार्गांनी आर्थिक लाभ होऊ शकतो. या राशीतील व्यक्तींना व्यवसायामध्ये सुद्धा चांगले यश मिळू शकते.