आता Ration Card तुमच्या मोबाईलवर; सरकारचा मोठा निर्णय

टाइम्स मराठी । पुरवठा विभागामार्फत रेशन कार्डधारकांना (Ration Card) पूर्वी प्रिंटेड रेशन कार्ड मिळत होते. परंतु आता शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक रेशन कार्ड धारकांना ई रेशन कार्ड देण्यात येणार आहे. हे रेशन कार्ड पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल. इ रेशन कार्ड (E- Ration Card) घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यानंतर संपूर्ण पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला इ रेशन कार्ड मिळेल. यासोबतच इ रेशन कार्ड व्यवस्था प्रणालीच्या माध्यमातून अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना क्यू आर कोड च्या माध्यमातून ई रेशन कार्ड ऑनलाइन आणि डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

   

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर मिळेल राशन कार्ड

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत (NPH ) अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब योजना (PHH) या सोबतच राज्य योजनेच्या एपीएल शेतकरी (APL Farmer) असं नमूद करण्यात येणार आहे. आता वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन रेशन कार्ड सुविधा ही शुल्क न घेता मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्जदारांनी इ रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करणे यासाठी गरजेचे असून अर्जाची पडताळणी केल्यानंतरच ऑनलाइन इ रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

एवढ्या लाभार्थ्यांनी घेतला राशन कार्ड चा लाभ

या ऑनलाईन रेशन कार्ड च्या माध्यमातून एजंटांचा त्रास कमी होऊन मोफत पद्धतीने कार्ड उपलब्ध होईल. पुणे शहरामध्ये 17 मे पासून ई रेशनकार्ड देण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. यानुसार आतापर्यंत 8921 रेशन कार्ड धारकांना ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड मिळाले आहे. शहरामध्ये अन्नपुरवठा चे 11 विभाग असून यामध्ये 3 लाख 35 हजार 3007 रेशन कार्ड आहेत. या रेशन कार्डचा लाभ 12,056,154 सदस्यांना मिळत असून आता डिजिटल पद्धतीने हे राशन कार्ड उपलब्ध होतील.