तुम्हीही बाहेर कुठेही Mobile चार्ज करता? वेळीच सावध व्हा; RBI चा इशारा

टाइम्स मराठी । कधी कधी आपण आपण घरी असताना मोबाईल चार्जिंगला लावायचं विसरून जातो. त्यामुळे बाहेर गेल्यावर मोबाईलची चार्जिंग संपल्यावर आपण मोबाईल चार्जिंगला लावण्याचा वेगळा ऑप्शन शोधतो. अशावेळी बऱ्याचदा सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर USB केबल द्वारे आपण त्या ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावतो. परंतु हे अत्यंत धोकादायक असल्याचं उघड झालं आहे. सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर मोबाईल चार्जिंग करणे हे आता हानिकारक असू शकतं. याठिकाणी चार्जिंग केल्याने तुमच्या मोबाईल मधील संपूर्ण डेटा चोरी होऊ शकतो.

   

रिजर्व बँक ऑफ इंडियाने याबाबत अलर्ट केलं आहे. ज्यूस जॅकिंग स्कॅमद्वारे सायबर क्रिमिनल्स मोबाईल मधील सर्व महत्त्वाचा डेटा चोरतात. आणि यामुळे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. आज काल बरेच सायबर गुन्हे होत आहेत. यापासून वाचण्यासाठी आरबीआय ने एक बुकलेट नुसार ज्यूस जॅकिंग घोटाळा बद्दल माहिती दिली. जूस जॅकिंग या घोटाळ्याच्या माध्यमातून स्कॅमर मोबाईल आणि लॅपटॉप मधील महत्त्वाचा डेटा चोरतात. यासाठी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन चा वापर करण्यात येत आहे.

या चार्जिंग स्टेशनवर मैलवेयर या प्रकारचे सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर इन्स्टॉल करण्यात येत आहे. त्यानंतर या चार्जिंग स्टेशनला चार्जिंगला लावण्यात आलेल्या मोबाईलमध्ये मैलवेयर ट्रान्सफर करण्यात येतात. त्यानंतर त्या मोबाईल मधील कॉलिंग डेटा, पासवर्ड, ईमेल ही सर्व माहिती स्कॅमरला मिळते. आणि तुमचा संपूर्ण डाटा स्कॅमरच्या हातात येतो. या घोटाळ्यापासून वाचण्यासाठी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन वापरणं टाळू शकतात. परंतु जर तुमच्या मोबाईल मध्ये अजिबातच चार्जिंग नसेल आणि तुम्हाला चार्जिंग स्टेशनचा वापर करणे अत्यंत गरजेचं असेल तर त्या ठिकाणी असलेली केबल तपासून घ्या. जर या केबल मध्ये काही शंका असल्यास तुम्ही यूएसबी केबल बदलून वापरू शकता. ज्यूस जॅकिंग या घोटाळ्यापासून वाचण्यासाठी आणखीन काही उपाय करणे गरजेचे आहे.

  1. तुम्ही तुमचा मोबाईल पासवर्ड ने सुरक्षित करू शकतात
  2. तुमच्या मोबाईलमध्ये अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट करा
  3. तुमचा मोबाईल कोणीही वापरू नये किंवा सेफ्टी साठी फिंगरप्रिंट स्कॅनर किंवा फेस आयडी चा वापर करा
  4. सार्वजनिक वायफाय नेटवर्क वापरणे टाळा