Google Pay, PayTM वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; RBI ने केली मोठी घोषणा

टाइम्स मराठी । सध्या सर्व ठिकाणी डिजिटलायझेशन झाल्यामुळे प्रत्येक व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करण्यास प्राधान्य देतो. त्यानुसार आजकाल हातावर मोजण्या एवढीच व्यक्ती कॅशचा वापर करतात. परंतु सहसा तरी UPI पेमेंटच्या माध्यमातूनच पेमेंट केले जाते. या UPI पेमेंट किंवा ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून दुधाच्या पिशवी पासून ते लाखो रुपयांपर्यंत ट्रांजेक्शन केले जातात. म्हणजे छोट्यात छोट्या गोष्टी पासून ते मोठ्या गोष्टी पर्यंत ऑनलाईन पेमेंट केले जाते. पण आता UPI युजर साठी एक महत्त्वाची बातमी आहे. UPI च्या माध्यमातून मनी ट्रांजेक्शन वाढवण्याचा निर्णय RBI ने घेतला आहे.

   

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याबाबत सांगितले की, आता UPI पेमेंटची लिमिट ही 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच आतापर्यंत यूजर्स एक लाख रुपयांपर्यंत ट्रांजेक्शन करू शकत होते. आता युजर्स ला 5 लाख रुपयांपर्यंत ट्रांजेक्शन करता येतील. पण हे ट्रांजेक्शन  फक्त शैक्षणिक संस्था आणि हॉस्पिटलमध्येच वापरता येईल असं देखील RBI गव्हर्नर यांनी सांगितलं.

सध्या NPCI ने यूपीआय पेमेंट साठी एक लिमिट सेट केली आहे. त्यानुसार प्रत्येक यूजर UPI च्या माध्यमातून एका दिवसात फक्त 1 लाख रुपये देऊ शकतो. पण त्यापेक्षा जास्त पैसे दिले जाऊ शकत नाही. त्याचबरोबर जे व्यक्ती दररोज 100 किंवा 200 रुपये ट्रांजेक्शन करतात, त्यांना याबाबत कोणतीच अडचण नाही. परंतु जे व्यक्ती एका दिवसात UPI च्या माध्यमातून जास्त व्यवहार करतात त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

NPCI नुसार, PayTM वरून  देखील एक लाख रुपयांपर्यंत ट्रांजेक्शन करता येऊ शकते. PayTM एका तासांमध्ये 20,000 रुपयांपर्यंत व्यवहार करण्यास परवानगी देते. आणि PHONEPE युजर्सला एका दिवसामध्ये 1 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करण्याची परवानगी देते. परंतु एखादी व्यक्ती ज्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करत आहे, त्यावर देखील हे अवलंबून आहे.