Realme 11 5G स्मार्टफोन लॉन्च; 108 MP कॅमेरा, किंमत किती?

टाइम्स मराठी । Realme कंपनीने भारतात लेटेस्ट स्मार्टफोन Realme 11 5G लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कमी किमतीमध्ये उपलब्ध असून यामध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन 2 स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोन खरेदीवर तुम्हाला डिस्काउंट ऑफर देखील देण्यात येणार आहे. रियलमी ने लॉन्च केलेल्या Realme 11 5G स्मार्टफोनची डिलिव्हरी 29 ऑगस्ट पासून करण्यात येणार आहे.

   

Realme 11 5G किंमत

Realme 11 5G या स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वाल्या वेरियंटची किंमत 18,999 आहे. तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 19,999 एवढी आहे. यासोबतच रियलमी ने अर्ली बर्ड सेलमध्ये Realme 11 5G स्मार्टफोन खरेदीवर 1500 रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या वेबसाईटवर आणि रिटेल स्टोअर्सवर 29 ऑगस्ट पासून या मोबाईलची विक्री करण्यात येईल.

स्पेसिफिकेशन– Realme 11 5G

Realme 11 5G या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच फुल एचडी 1080 ×2400 पिक्सल रिझोल्युशन असलेला AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले 120 Htz रिफ्रेश रेट सह येत असून त्याचा टच सॅम्पलिंग रेट 240 htz एवढा आहे. यासोबतच हा स्मार्टफोन अँड्रॉइड13 बेस्ड Realme UI 4.0 वर चालतो. स्मार्टफोनमध्ये 6nm मीडियाटेक डायमेंसिमेंटी 6100+प्रोसेसर देण्यात आले आहे. रियलमीच्या या मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध असून ही बॅटरी 67 W च्या SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचबरोबर 17 मिनिटांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत हा स्मार्टफोन चार्ज होतो.

कॅमेरा

Realme 11 5G या स्मार्टफोनमध्ये 156 जीबी पर्यंत इनबिल स्टोरेज देण्यात आलेले असून मायक्रो एसडी कार्ड च्या माध्यमातून दोन TB पर्यंत वाढवता येऊ शकते. त्याचबरोबर या स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. या प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल देण्यात आलेला असून हा सॅमसंग ISOCELL HM6 कॅमेरा आहे. त्याचाच अपर्चर F/1.75 एवढा देण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये सेकंडरी कॅमेरा दोन मेगापिक्सल चा असून सेल्फी साठी F/2.45 सह 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटी

Realme 11 5G या स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ड्युअल सिम, ड्युएल स्टॅन्ड बाय फाईव्ह जी कनेक्टिव्हिटी, 4G lite, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2 जिपीएस, ए जिपीएस, यूएसबी टाइप सी पोर्ट, आणि सिक्युरिटी साठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे.