Realme 12+ 5G : 50MP कॅमेरा, 12GB रॅमसह Realme ने लाँच केला आकर्षक मोबाईल

Realme 12+ 5G : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Realme ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवा मोबाईल लाँच केला आहे. Realme 12+ 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 12GB रॅम आणि 50MP कॅमेरासह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने हा स्मार्टफोन सध्या मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये लाँच केला असून लवकरच तो भारतीय बाजारात सुद्धा दाखल होणार आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत .

   

6.67-इंचाचा डिस्प्ले –

Realme 12+ 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.67-इंचाचा फुल-एचडी+OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2,400 x 1,080 पिक्सेल रिझोल्युशन सह येत असून तो 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 2,000 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. खास गोष्ट म्हणजे कंपनीने या डिस्प्लेमध्ये रेनवॉटर स्मार्ट टच सपोर्ट सुद्धा दिला आहे. ज्यामुळे तुम्ही ओल्या हाताने जरी मोबाईल वापरला तरी काही टेन्शन नाही. मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर देण्यात आला आहे. Realme च्या या स्मार्टफोनमध्ये 67W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी बसवण्यात आली आहे.

50MP कॅमेरा – Realme 12+ 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme 12+ 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये पाठीमागील बाजूला OIS सपोर्ट सह 50MP Sony LYT-600 मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो शूटर कॅमेराचा समावेश आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 16MP चा AI सपोर्टर कॅमेरा उपलब्ध आहे. मोबाईल मध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे.

किंमत किती?

मोबाईलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, मलेशियामध्ये या फोनच्या 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत IDR 41,99,000 म्हणजेच भारतीय चलनानुसार, अंदाजे 22,200 रुपये आहे. तर 12GB + 256GB मॉडेलची किंमत MYR 1,499 म्हणजेच अंदाजे 26,200 रुपये ठेवण्यात आली आहे.