Realme 12 Pro 5G Series :प्रसिद्ध मोबाईल कंपनी Realme ने भारतीय बाजारपेठेत Realme 12 Pro 5G Series लाँच केली आहे. या सिरीज अंतर्गत कंपनीने Realme 12 Pro 5G आणि Realme 12 Pro Plus 5G असे २ मोबाईल आणले आहेत. या दोन्ही मोबाईल मध्ये अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहेत. आज आपण Realme च्या या दोन्ही स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि त्यांच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात…
Realme 12 Pro 5G चे फीचर्स- Realme 12 Pro 5G Series
Realme 12 Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा फुल HD+ AMOLED कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईलमध्ये स्नैपड्रैगन 7 जेनरेशन 2 प्रोसेसर बसवण्यात आला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. कंपनीने Realme 12 Pro 5G मध्ये 5000mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला 50MP मुख्य कॅमेरा आणि 32MP चा Sony IMX709 सेन्सर आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय समोरील 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतोय. या मोबाईलच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची सुरुवातीची किंमत 25,999 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 26,999 रुपये आहे.
Realme 12 Pro Plus चे फीचर्स
Realme 12 Pro Plus मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा FHD प्लस OLED डिस्प्ले मिळतो. मोबाईल मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 चिपसेट वापरण्यात आली आहे. कंपनीने Realme 12 Pro Plus मध्ये 5000mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोनच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये पाठीमागील बाजूला 64MP चा मुख्य कॅमेरा, दुसरा 50 मेगापिक्सलचा Sony IMX 890 कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड एंगल कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फोटो आणि विडिओ कॉल साठी (Realme 12 Pro 5G Series) समोरील बाजूला 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतोय. या स्मार्टफोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 29,999 रुपये, 8GB रॅम + 256GB स्टोरेज मोबाईलची किंमत 31,999 रुपये आणि 12GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 33,999 रुपये आहे.