Realme 12X 5G स्वस्तात लाँच; 8GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह मिळतात खास फीचर्स

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Realme ने भारतीय बाजारात सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा किमतीत नवा मोबाईल लाँच केला आहे. Realme 12X 5G असे या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 8GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. मोबाईलचा लूक सुद्धा अतिशय आकर्षक असा आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किमत याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

   

6.72-इंचाचा डिस्प्ले –

Realme 12X 5G मध्ये 6.72-इंच फुल-एचडी+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येत असून यामध्ये 2,400 x 1,080 पिक्सेल रिझोल्युशन आणि 950 nits पीक ब्राइटनेस लेव्हल मिळतेय. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 6nm MediaTek Dimensity 6100+ SoC चिपसेट बसवली असून रिअलमी चा हा मोबाईल Android 14-आधारित Realme UI 5.0 ऑपरेटिंग सिस्टीम वर चालतो. मोबाईल मध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB चे मजबूत असे स्टोरेज देण्यात आले आहे.

कॅमेरा – Realme 12X 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme 12X 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी कॅमेरा सेटअप आहे. तर विडिओ कॉल आणि सेल्फी साठी समोरील बाजूला 8MP फ्रंट कॅमेरा बसवण्यात आलाय. पॉवरसाठी 45W
सुपरVOOC चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत किती ??

मोबाईलच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, Realme 12X 5G च्या 4GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये, 6GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 13,499 रुपये आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 14,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन पर्पल आणि ग्रीन या २ कलर मध्ये उपलब्ध असून येत्या 5 एप्रिलपासून Flipkart आणि Realme स्टोअर वरून तुम्ही खरेदी करू शकता.