Realme C51 Vs C53; कोणता Mobile बेस्ट? पहा संपूर्ण डिटेल्स

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Realme कंपनीने लेटेस्ट एंट्री लेव्हल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कमी किमतीमध्ये लॉन्च करण्यात आला असून Realme C51 असं या स्मार्टफोनचं नाव आहे. तसेच यापूर्वी रियल मी कंपनीने काही दिवसांपूर्वी C53 हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. त्यामुळे C53 आणि C51 यांच्यातच स्पर्धा पाहायला मिळत आहे. तुम्हाला सुद्धा या दोन्हींमधील कोणताही एक मोबाईल घ्यायचा असेल परंतु नेमका कोणता मोबाईल घ्यावा याबाबत तुमच्या मनात गोंधळ होत असेल तर आज आम्ही तुम्हाला या दोन्ही स्मार्टफोनची खास फीचर्सची तुलना करून सांगणार आहोत. मग तुम्हीच ठरवा कोणता मोबाईल तुमच्यासाठी बेस्ट आहे.

   

Realme C51 स्पेसिफिकेशन

Realme C51 या स्मार्टफोनमध्ये 6.74 इंच चा डिस्प्ले देण्यात आलेला असून हा डिस्प्ले 90 hz रिफ्रेश रेट सह उपलब्ध आहे. एवढेच नाही तर यामध्ये 560 नीटस पर्यंत पीक ब्राईटनेस देखील ऑफर करण्यात येतो. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी पॅक देण्यात आलेला असून ही बॅटरी ते 33 W चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी 28 मिनिटांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. या स्मार्टफोनमध्ये Unisoc T612 प्रोसेसर देण्यात आले आहे.

Realme C53 स्पेसिफिकेशन

Realme C53 या स्मार्टफोनमध्ये 6.74 इंच एलसीडी स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचे रिझोल्यूशन 1600 × 720 पिक्सल आहे. हा स्मार्टफोन 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येतो. या डिस्प्ले मध्ये ड्यू ड्रॉप नॉच उपलब्ध आहे. एवढेच नाही तर या स्मार्टफोनमध्ये 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 560 नीटस पीक ब्राईटनेस लेवल देण्यात आली आहे. यासोबतच Realme C53 या स्मार्टफोनच्या बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 5000mAh बॅटरी असून बाकीच्या व्हेरिएंट प्रमाणे 18 W चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme C51 कॅमेरा आणि स्टोरेज

Realme C51 या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर, यात 50 MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आलेला असून 5 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 GB RAM आणि 64 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. हे स्टोरेज एसडी कार्ड च्या माध्यमातून 2 TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

Realme C53 कॅमेरा आणि स्टोरेज

Realme C53 या स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर, हा स्मार्टफोन दक्षिण पूर्व एशियाई व्हर्जन मध्ये येतो. यामध्ये 108 MP चा मुख्य कॅमेरा, दुसरा सेकंडरी मोनोक्रोम सेंसर आणि समोरील बाजूला 8 मेगापिक्सलचाचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 108 MP सेन्सर मध्ये तुम्हाला हाय रिझोल्युशन मिळते जेणेकरून फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी चांगला अनुभव मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोअर देण्यात आले आहे. त्याचबरोबर दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 6 GB रॅमसह 64 GB इंटरनल स्टोअर देण्यात आलेला आहे.

Realme C53 आणि Realme C51

Realme C53 आणि Realme C51 या दोन्ही स्मार्टफोन मध्ये बेस्ट कोणता आहे ठरवायचं झालं तर Realme C51 च्या तुलनेत Realme C53 या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेला कॅमेरा बेस्ट आहे. त्याचबरोबर Realme C53 यामध्ये देण्यात आलेले फीचर्स देखील परिपूर्ण आहे. त्यामुळे रियलमी कंपनीचा Realme C53 हा स्मार्टफोन बेस्ट आहे.