Realme C53 भारतात लाँच; 108 MP कॅमेरा, किंमत 10 हजारांपेक्षाही कमी

टाइम्स मराठी । भारतात Realme कंपनीचा Realme C53 हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन चॅम्पियन गोल्ड आणि चॅम्पियन ब्लॅक या दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. रिअलमीच्या या स्मार्टफोनला 108 MP चा दमदार कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना फोटो काढायची हौस आहे अशा लोकांसाठी हा मोबाईल बेस्ट पर्याय ठरणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे Realme C53 ची किंमत १० हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे देशातील सर्वसामान्य माणसाला हा मोबाईल खरेदी करणं नक्कीच परवडणारे आहे. आज आपण रिअलमीच्या या मोबाईलचे सर्व फीचर्स जाणून घेऊयात.

   

6.74 इंच डिस्प्ले –

Realme C53 या स्मार्टफोनमध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह 6.74 इंच एलसीडी स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचे रिझोल्यूशन 1600 × 720 पिक्सल आहे. या डिस्प्ले मध्ये ड्यू ड्रॉप नॉच उपलब्ध आहे. एवढेच नाही तर या स्मार्टफोनमध्ये 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 560 नीटस पीक ब्राईटनेस लेवल देण्यात आली आहे. यासोबतच Realme C53 या स्मार्टफोनला 5000mAh बॅटरी असून ही बॅटरी 18 W चार्जिंगला सपोर्ट करते.

डिझाईन – Realme C53

Realme C53 या स्मार्टफोनच्या डिझाईन आणि फिचर्स बद्दल बोलायचं झालं तर हा iphone pro या मॉडेल पासून प्रेरित असून यामध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा सेटअप मुळे खास लुक मिळतो. यामध्ये कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश लाईट ला सपाट कडा देण्यात आलेल्या असून स्मार्टफोनच्या मागच्या साईडने 3 स्पेशल गोलाकार मोड्युल देण्यात आले आहे. हे गोलाकार मोड्युल स्मार्टफोनच्या युजर्स ला आकर्षित करतात.

कॅमेरा –

Realme C53 या स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 108 MP चा मुख्य कॅमेरा, सेकंडरी मोनोक्रोम सेंसर 8 मेगापिक्सल आणि सेल्फीसाठी समोरील बाजूला 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. हा मोबाईल 4GB रॅम 128 GB स्टोरेज आणि 6 GB रॅम+ 64 GB स्टोरेज या २ व्हेरिएन्ट मध्ये उपलब्ध आहे.

अन्य फीचर्स –

Realme C53 या स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटी मध्ये ड्युअल सिम स्लॉट 4G मध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर ड्युअल बैंड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट उपलब्ध आहे. यासोबतच 3.5 मी हेडफोन जॅक, यूएसबी टाइप सी पोर्ट यामध्ये आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये तुम्ही कोणताही प्रकारचा हेडफोन वापरू शकता.

किंमत किती ?

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Realme C53 या स्मार्टफोनच्या किंमत 4GB रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोअर असलेल्या व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये असून 6GB रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोअर असलेल्या दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. तुम्हाला हाच स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास 26 जुलैला खरेदीसाठी उपलब्ध होईल. तुम्ही हा स्मार्टफोन 26 जुलैला बारा वाजता Realme. Com, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन स्टोअर्स वर मिळेल.