Realme C67 5G : Realme ने लाँच केला C67 5G मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

Realme C67 5G : Realme ने भारतीय बाजारपेठेत Realme C67 5G मोबाईल लॉन्च केला आहे. हा Realme C सीरीज चा पहिला 5G सपोर्ट मध्ये उपलब्ध असलेला स्मार्टफोन आहे. कंपनीने लॉन्च केलेला हा नवीन स्मार्टफोन डार्क पर्पल आणि सनी ऑसिस या दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध असून या मोबाईल मध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच आयफोनच्या डायनामिक आयलँड प्रमाणे मिनी कॅप्सूल 2.0 फीचर देखील यामध्ये देण्यात आले आहे.

   

स्पेसिफिकेशन

Realme C67 5G स्मार्टफोन मध्ये 6.72 इंच Fhd + डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 hz रिफ्रेश रेट आणि 680 nits पीक ब्राइटनेस ऑफर करतो. कंपनीने या मोबाईल मध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6100+ प्रोसेसर दिला असून यामध्ये तुम्हाला 6 GB  रॅम आणि 128 GB स्टोरेज मिळते.

कॅमेरा- Realme C67 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme C67 या स्मार्टफोन मध्ये कंपनीने ड्युअल रियर कैमरा सेटअप दिले आहे. त्यानुसार यात 50 MP प्राइमरी कॅमेरा, 2-MP पोर्ट्रेट शूटर, सेल्फी साठी में 8 MP फ्रंट कैमरा यामध्ये मिळतो. कंपनीने या मोबाईल मध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 33W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्स बाबत सांगायच झाल्यास, Realme C67 5G मोबाईल मध्ये USB टाइप-C पोर्ट , साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहे. या स्मार्टफोनला वाटर और डस्ट रेसिस्टेंट साठी IP54 रेटिंग देण्यात आली आहे. म्हणजेच हा मोबाईल तुम्ही पाणी किंवा कितीही प्रदूषणाच्या आरामात ठिकाणी वापरू शकतात.

किंमत किती?

Realme C67 5G हा स्मार्टफोन कंपनीने दोन स्टोरेज ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे. त्यानुसार 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असलेल्या व्हेरीएंट ची किंमत 13,999 रुपये आहे. आणि 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरीएंटची कीमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही देखील हा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 16 डिसेंबर पासून खरेदी करू शकता. या मोबाईलच्या खरेदीवर कंपनीने 2000 रुपयांचा डिस्काउंट ऑफर देखील दिला आहे.