Realme GT5 Pro मोबाईल लाँच; बोट न लावता हाताच्या इशाऱ्यावर हॅण्डल करता येणार

Realme GT5 Pro : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Realme भारतीय मार्केटमध्ये वेगवेगळे मोबाईल लॉन्च करत करते. या मोबाईलच्या किमती सुद्धा इतर ब्रँडच्या तुलनेत कमी असल्याने ग्राहकांची मोठी पसंती Realme ला मिळत असते. आताही कंपनीने Realme GT5 Pro हा नवीन मोबाईल बाजारात आणला आहे, मात्र हा मोबाईल भारतात नव्हे तर चिनी मार्केट मध्ये लाँच कऱण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा मोबाईल टच न करता फक्त हातांचे इशारे करत आपण हँडल करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया Realme GT5 Pro चे फीचर.

   

Realme GT5 Pro मध्ये 6.78 इंच कर्व्ह OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 144 hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. यासोबतच हा डिस्प्ले 4.500 nits पीक ब्राईटनेस देखील ऑफर करतो. या मोबाईल मध्ये कंपनीने लेटेस्ट लॉन्च करण्यात आलेले क्वालकॉम स्नॅपड्रॅगन जेन 3 चिपसेट देण्यात आला आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे Realme GT5 Pro मध्ये कंपनीने 12 जेस्चर कंट्रोल फीचर्स दिले आहे. हे जेस्चर कंट्रोल फीचर्स फक्त मोबाईलचा इंटरफेस नाही तर सोशल मीडिया ॲप्स ला देखील सपोर्ट करते.

wp 1693212449418

कॅमेरा- Realme GT5 Pro

Realme GT5 Pro या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रीयर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यानुसार प्रायमरी कॅमेरा 50 MP, सेकंडरी कॅमेरा 50 MP , अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा 8 MP आणि फ्रंट कॅमेरा 32 MP एवढा आहे. या कॅमेरा सेटअप सोबतच प्रायमरी आणि सेकंडरी कॅमेरासह OIS आणि EIS सपोर्ट मिळतो. यासोबतच 3x झूम देखील यामध्ये मिळते.

किंमत किती?

Realme GT5 Pro या मोबाईल मध्ये 12GB रॅम, 256 GB इंटरनल स्टोरेज, 16 GB + 512 GB, 16 GB + 1TB हे तीन स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. त्यानुसार या स्मार्टफोनची किंमत 12GB + 256 GB स्टोरेज साठी 3399 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 39,900 रुपये आहे. 16 GB + 512 GB स्टोरेज साठी 3,999 युआन म्हणजे 46,900 रुपये आहे. आणि 16 GB + 1TB या स्टोरेज व्हेरीएंट ची किंमत 4,299 युआन म्हणजेच 50,400 रुपये आहे. कंपनीने हा मोबाईल तीन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे.