Realme GT5 Pro मोबाईल लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । Realme कंपनी मार्केटमध्ये वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये स्मार्टफोन लॉन्च करत असते. आता कंपनीने Realme GT5 Pro हा मोबाईल लॉन्च केला आहे. हा मोबाईल रेड रॉक, ब्राईट मून, स्टारी नाईट या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. कंपनीने हा मोबाईल अप्रतिम डिझाईन सह उपलब्ध केला असून यामध्ये 5400 mah बॅटरी देण्यात आली आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन

Realme GT5 Pro या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2780×1264 पिक्सल रिझोल्युशन  आणि 144 hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. कंपनीने या मोबाईल मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर दिले आहे. या प्रोसेसर सोबतच 16 GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज मिळते. Realme कंपनीचा हा मोबाईल ANDROID 14 वर बेस्ड असून REALME UI 5.0 वर काम करतो. 

कॅमेरा– Realme GT5 Pro

Realme GT5 Pro या मोबाईल मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्यानुसार यामध्ये 50 MP प्रायमरी कॅमेरा आणि OIS सपोर्ट उपलब्ध आहे. प्रायमरी कॅमेरा सोबतच 50 MP पेरिस्कोपीक सेंसर आणि 8 MP अल्ट्रा व्हाइड सेन्सर मिळते. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी स्मार्टफोन मध्ये 32 MP फ्रंट कॅमेरा मिळतो. Realme GT5 Pro या मोबाईल मध्ये कंपनीने 5400 मेगाहर्ट बॅटरी उपलब्ध केली आहे. ही बॅटरी 100W फास्ट चार्जिंगला आणि 50 W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Realme GT5 Pro या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये देण्यात आलेल्या 12 GB, 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 3298 म्हणजेच 38,682 रुपये आहे. 16GB, 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 3598 म्हणजेच 42,201 रुपये आहे. 16 GB, 512 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत CNY 3898 म्हणजेच 45,719 रुपये आहे. 16 GB + 1 TB पर्यंत स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 4198 म्हणजेच 49,238 रुपये आहे.