Realme लवकरच लॉन्च करणार GT5 Pro स्मार्टफोन; काय असतील फीचर्स पहा

टाइम्स मराठी । Realme ही मोबाईल निर्माता कंपनी बाजारात सातत्याने नवनवीन मोबाईल लाँच करत असते. इतर ब्रँडच्या तुलनेत Realme चे मोबाईल हे स्वस्त असल्याने ग्राहकांची पसंती सुद्धा या मोबाईलला मिळत असते. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात कंपनीने मार्केटमध्ये Realme GT 5 हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनीकडून यात अपडेटेड व्हर्जन मध्ये नवीन मोबाईल लॉन्च करण्यात येणार आहे. या नवीन अपडेटेड स्मार्टफोनचा नुकताच कंपनीने टिझर लॉन्च केला. त्यानुसार या स्मार्टफोनचे नाव Realme GT5 Pro असेल. या मोबाईलच्या लॉन्चिंगची डेट अजूनही उघड झाली नसून लवकरच हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येऊ शकतो.

   

स्पेसिफिकेशन

Realme GT5 Pro या स्मार्टफोनच्या टिझरमध्ये स्मार्टफोनचे पोस्टर रिलीज करण्यात आले. हा स्मार्टफोन नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला लॉन्च होऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचचा OLED डिस्प्ले देण्यात येऊ शकतो. हा डिस्प्ले 144 hz रिफ्रेश रेटसह येतो. यामध्ये कंपनीकडून स्नॅपड्रॅगन  8 Gen 3 प्रोसेसर देण्यात येऊ शकतो. त्याचबरोबर हा स्मार्टफोन Android 14 वर बेस्ड Realme UI 5.0 वर काम करेल.

कॅमेरा

Realme GT5 Pro मध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात येऊ शकतात. त्यानुसार तीनही कॅमेरे 50 मेगापिक्सेल एवढे असतील. या स्मार्टफोनमध्ये बॅकअप साठी 54000 mAh बॅटरी प्रदान करण्यात येऊ शकते. ही बॅटरी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईलच्या सोरेज बाबत सांगायचं झाल्यास यामध्ये 24 GB रॅम आणि एक TB पर्यत इंटर्नल स्टोरेज देण्यात येऊ शकते.