आता Mobile स्टोरेजची चिंता सोडा! Realme घेऊन येतेय 2 दमदार स्मार्टफोन; उद्यापासून प्री- बुकिंग

टाईम्स मराठी । आजकालच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक क्षण कॅप्चर करून शेअर केला जातो. हे क्षण आपण फोटो अल्बम मध्ये ठेवतो. त्याचबरोबर एखादी डॉक्युमेंट फाईल, रील कॅमेरा, सीडी, कॅसेट यासारख्या स्टोरेज वर अवलंबून असतो. ज्यामुळे महत्वाच्या आणि आठवणीतल्या गोष्टी आपल्याकडे राहतील. पण आता स्मार्टफोनमुळे आपला डाटा जपून ठेवणे आणि एक्सेस करणे खूप सोपं झालेलं आहे. त्याचबरोबर स्मार्टफोन घ्यायला जात असताना आपण बाकीच्या फिचर्स यासह स्टोरेज कडे जास्त लक्ष देतो. बऱ्याचदा डाटा जास्त झाल्यामुळे स्मार्टफोन स्टोरेज फुल होते. आणि नाईलाजाने आपल्याला काही डाटा डिलीट करावा लागतो. पण यावर एक सोल्युशन म्हणून मार्केटमध्ये जास्त स्टोरेज वाला स्मार्टफोन लॉन्च झाला आहे.

   

यंग आणि डायनामिक ब्रँड रियलमी ने लेटेस्ट Realme Narzo 60 5G आणि Narzo 60 Pro 5G या दोन्ही मोबाइलचे प्री- बुकिंग उद्यापासून सुरु केलं आहे. या दोन्ही मोबाईल मध्ये 12 GB पर्यंत रॅम आणि 1 TB पर्यंत स्टोरेज मिळेल. या स्मार्टफोन मध्ये व्यापक स्टोरेज ऑप्शन देत भारतीय बाजारपेठेत रियलमीने चार चांद लावले आहेत. रियलमी नार्जो 60 सिरीज ही 1 TB रियलमी स्मार्टफोन सादर करणारी पहिली सिरीज आहे. हा स्मार्टफोन भारतीय जनरेशन जेड युजर साठी डिझाईन केलेला असून ज्यांना जास्त स्टोरेज कॅपॅसिटी गरजेची आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे.

या स्मार्टफोन मध्ये स्टोरेज कॅपॅसिटी सह वेगवेगळे फीचर्स आणि लाभ देण्यात आलेले आहे. यामध्ये 1 टीबी स्टोरेज असून मोठ्या गेम फाईल देखील तुम्ही डाऊनलोड करू शकाल. त्याचबरोबर या स्मार्टफोन सिरीज मध्ये 61 डिग्री कर्वेचर, मोठे स्टोरेज प्रकार देण्यात आले आहे. जेणेकरून तुम्ही 2,50000 फोटोज स्टोअर करून ठेवू शकतात. रियलमी नार्जो 60 सिरीज 5G यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. त्याचबरोबर हाई – रिझोल्युशन कॅमेरा, लाइटिंग फास्ट प्रोसेसर, इमर्सिव्ह डिस्प्ले यासह उत्कृष्ट एक्स्पिरियन्स देण्याचा दावा ही कंपनी करते. हा स्मार्टफोन स्टायलिश आणि मॉर्डन दिसण्यासाठी डिझाईन वर खास करून लक्ष दिलेले आहे.

मोबाइलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास Realme Narzo 60 5G फोनमध्ये 64-मेगापिक्सलचा प्राइमरी रिअर कॅमेरा सेन्सर दिला जाईल. Realme India ने सांगितले आहे की ते 6 जुलै रोजी दुपारी 12 वाजता Narzo 60 सीरीज भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. Realme Narzo 60 Pro ची प्री-बुकिंग करणाऱ्यांना 1,500 रुपयांची सूट मिळेल, तर Realme Narzo 60 ची प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 1,000 रुपयांची सूट मिळेल.