Realme Narzo 60x 5G चा सेल सुरु; पहा बंपर ऑफरसह मोबाईलचे फीचर्स

टाइम्स मराठी । काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारपेठेत लॉन्च झालेल्या Realme Narzo 60x 5G या स्मार्टफोनचा सेल सुरु झाला आहे. हा स्मार्टफोन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Realme च्या अधिकारिक वेबसाईटवर वरून खरेदी करता येणार आहे. मोबाईलचा हा पहिलाच सेल असल्यामुळे कंपनीकडून या स्मार्टफोनवर हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. आज आपण या मोबाईलची किंमत, त्यावर देण्यात आलेल्या ऑफर्स आणि महत्तवाचे ,म्हणजे मोबाईल मधील फीचर्स याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

   

6.72 इंचाचा डिस्प्ले-

Realme Narzo 60x 5G या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच चा FHD +IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 hz रिफ्रेश रेट सह येत आहे आणि 180 hz टच सॅम्पलिंग रेट ऑफर करतो. त्याचबरोबर हा डिस्प्ले 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशन प्रदान करतो. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेनसिटी 6100+ प्रोसेसर उपलब्ध आहे. Realme चा हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 या ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतो.

कॅमेरा – Realme Narzo 60x 5G

Realme Narzo 60x 5G स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सल AI प्रायमरी सेंसर देण्यात आला आहे. फ्रंट ला सेल्फी साठी 8 मेगापिक्सल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल रियर कॅमेरा या डिवाइसमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोन मध्ये 5000 mAh ची दमदार बॅटरी देण्यात आलेली असून ही बॅटरी 33 W चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटी फीचर्स –

Realme Narzo 60x 5G या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, यूएसबी टाइप सी हे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आलेले आहे. यासोबतच फिंगरप्रिंट सेंसर, कंपास मॅग्नेटोमीटर, प्रॉक्सीमिटी सेंसर, एक्सेलेरो मिटर, एबीयंट लाईट सेंसर हे फीचर्स देखील देण्यात आले आहे.

Realme Narzo 60x 5G हा स्मार्टफोन नेबुला पर्पल, स्टेलर ग्रीन हे कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनची किंमत 4 GB रॅम + 64 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटसाठी 12,999 एवढी आहे. आणि 6 GB रॅम + 128 GB इंटरनल स्टोरेज व्हेरीएंट ची किंमत 14,999 रुपये आहे. अमेझॉन वर या स्मार्टफोनचा पहिला सेल असल्यामुळे तुम्हाला हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.