Realme Narzo 70 Pro 5G : हात न लावताही कंट्रोल करता येणार मोबाईल; Realme ने आणलं खास फिचर

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Realme ने भारतात आपला नवा आणि आकर्षक असा मोबाईल लाँच केला आहे. Realme Narzo 70 Pro 5G असे या मोबाईलचे नाव असून महत्वाची आणि खास बाब म्हणजे हात न लावता सुद्धा तुम्ही हा स्मार्टफोन हॅन्डल करू शकता. कंपनीने या मोबाईल मध्ये क्रिएटिव्ह एअर जेश्चर फीचर दिले आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, त्याचे स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

   

Realme Narzo 70 Pro 5G मध्ये कंपनीने 120hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेला 2000nits पीक ब्राइटनेस सह रेनवॉटर टच आणि सनलाईट मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन ग्लास डिझाइनसह लाँच करण्यात आला आहे. रिअलमी ने मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 7050 5G प्रोसेसर बसवला असून हा मोबाईल Android 14 पर आधारित Realme UI 5.0 वर काम करतो. Realme Narzo 70 Pro 5G मोबाईल 8GB +128GB आणि 8GB + 256GB स्टोरेज अशा 2 स्टोरेज पर्यायात आणला आहे. तसेच स्मार्टफोन मध्ये व्हर्च्युअल रॅमची सुविधाही देण्यात आली आहे.

कॅमेरा – Realme Narzo 70 Pro 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme Narzo 70 Pro 5G मध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा + 8MP अल्ट्रा वाईड + 2MP च्या मॅक्रो कॅमेरा असा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 67W सुपर VOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

मोबाईलच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, Realme Narzo 70 Pro 5G च्या 8GB+128GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 19,999 रुपये आहे तर 8GB+256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे.