Amazon वर सुरू आहे बंपर ऑफर!! 8000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय ब्रँडेड Mobile

टाइम्स मराठी । अमेझॉन या ई-कॉमर्स  शॉपिंग ॲपवर  वेगवेगळ्या वस्तूंवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत असतात. या ऑफरचा लाभ घेत ग्राहक वेगवेगळे प्रोडक्ट्स कमी किमतीमध्ये खरेदी करतात. त्याचबरोबर बेस्ट ऑफरच्या माध्यमातून प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे ब्रँडेड स्मार्टफोन कमी किमतीमध्ये खरेदी करता येऊ शकतात. तुम्ही देखील ब्रँडेड मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल, परंतु बजेट मुळे शक्य होत नसेल तर आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत 8000 रुपयांपेक्षाही कमी किमतीमध्ये उपलब्ध असलेल्या ब्रँडेड स्मार्टफोन बद्दल. आणि या स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर बद्दल.

   

ऑफर

Realme या ब्रँड चा मोबाईल अमेझॉनवर 8000 रुपयांपेक्षाही कमी किमतीमध्ये खरेदी करता येऊ शकतो. Amazon वर लाईव्ह करण्यात आलेल्या ऑफर पेजवर उपलब्ध असलेली सुपर स्ट्राईकर डील सुरु आहे. या डील च्या माध्यमातून 10,999 रुपयात उपलब्ध असलेला Realme Narzo N53 हा स्मार्टफोन 7,999 रुपयांमध्ये मिळत आहे. ही ऑफर 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट साठी उपलब्ध आहे. यासोबतच Amazon वर एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे. या ऑफरच्या माध्यमातून 7500 रुपये डिस्काउंट देण्यात येत आहे. तुम्ही देखील या ऑफरचा लाभ घेऊ शकता. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स.

स्पेसिफिकेशन

Realme Narzo N53 या स्टोरेज व्हेरीएंट मध्ये 6.74 इंच  वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 HZ रिफ्रेश रेटसह येतो. या मोबाईल मध्ये उपलब्ध करण्यात आलेला डिस्प्ले 180 HZ टच सॅम्पलिंग रेट यासह 450 निट्स ब्राईटनेस आणि 16.7 m कलर्स देतो. या स्मार्टफोन मध्ये कंपनीने Unisoc T612 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला असून हा मोबाईल Android १३ वर बेस्ड OneUI वर काम करतो.

कॅमेरा

Realme Narzo N53 या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यानुसार स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 77° FOV  50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हा प्रायमरी कॅमेरा एक 5MP लेन्सचा आहे. यासोबतच फ्रंट मध्ये 8 MP कॅमेरा उपलब्ध करण्यात आला आहे. हा फ्रंट कॅमेरा F/2.0 अपर्चरसह उपलब्ध आहे. या मोबाईलमध्ये बॅकअप साठी 5000 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 33 W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते.