Realme Narzo N53 नव्या स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च; किंमतही परवडणारी

टाइम्स मराठी । Realme ही कंपनी भारतामध्ये बरेच स्मार्टफोन लॉन्च करत असते. काही दिवसांपूर्वी कंपनीने Realme Narzo N53 हा मोबाईल 6 GB रॅम आणि 4 GB रॅम मध्ये उपलब्ध केला होता. आता Realme ने हाच मोबाईल 8 GB रॅमसह भारतात लाँच केला आहे. या मोबाईलची किंमतही अगदी सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशीच आहे. आज आपण Realme Narzo N53 ची खास वैशिष्ट्ये आणि किमतीबद्दल जाणून घेणार आहोत.

   

स्पेसिफिकेशन

Realme Narzo N53 मध्ये 6.74 इंच चा वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले उपलब्ध करण्यात आले आहे. हा डिस्प्ले 90 HZ रिफ्रेश रेटसह येतो.  त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध करण्यात आलेला डिस्प्ले 180 HZ टच सॅम्पलिंग रेट यासह 450 निट्स ब्राईटनेस आणि 16.7 m कलर्स उपलब्ध करतो. या स्मार्टफोन मध्ये कंपनीने Unisoc T612 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे. हा मोबाईल Android १३ वर आधारित OneUI वर काम करतो.

कॅमेरा– Realme Narzo N53

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झालयास, Realme Narzo N53 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यानुसार स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 77° FOV  50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हा प्रायमरी कॅमेरा एक 5P लेन्स आहे. यासोबतच फ्रंट मध्ये 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. हा फ्रंट कॅमेरा F/2.0 अपर्चरसह उपलब्ध आहे.

बॅटरी

Realme Narzo N53 या स्मार्टफोन मध्ये बॅकअप साठी 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 33 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. त्याचबरोबर या मोबाईलमध्ये रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देखील उपलब्ध आहे. तुम्हाला सेक्युरिटी साठी साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर उपलब्ध करण्यात आले आहे. या सोबतच फेस अनलॉक फीचर्स देखील देण्यात आले आहे.

स्टोरेज व्हेरिएंट

Realme Narzo N53 या स्मार्टफोनमध्ये दोन नॅनो सिम कार्ड सपोर्ट उपलब्ध आहे. हा 4G फोन असून ब्लूटूथ, वाय-फाय, ओटीजी सपोर्ट देखील मिळतोय. . या मोबाईलमध्ये आधी फक्त 4 GB रॅम + 64 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट, आणि 6 GB + 128 GB स्टोरेज उपलब्ध होते. आता कंपनीने 8 GB रॅम + 128 GB स्टोरेज वेरियंट वेरीएंट मध्ये हा मोबाईल आणला आहे.

किंमत

Realme Narzo N53 या स्मार्टफोनच्या किमती स्टोरेज व्हेरिएंट प्रमाणे वेगवेगळ्या आहेत. त्यानुसार 4GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये तर 6 GB रॅम आणि 128 GB  स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत 10,999 रुपये एवढी ठेवण्यात आली होती. आता कंपनीने नव्याने लाँच केलेल्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरियंटची किंमत 11,999 रुपये एवढी आहे.