Realme Note 50 : Realme ने लाँच केला Note 50 मोबाईल; किंमत 6000 पेक्षा कमी

Realme Note 50 । प्रसिद्ध मोबाईल कंपनी Realme ने आपला पहिला Note स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Realme Note 50 असे या मोबाईलचे नाव असून कंपनीने अगदी कमी किमतीमध्ये हा मोबाईल लाँच केला आहे. या स्मार्टफोन मध्ये अनेक खास असे फीचर्स देण्यात आले असून Realme च्या या स्वस्तात मस्त मोबाईल मुळे इतर कंपन्यांची झोप उडणार हे मात्र नक्क्की…. आज आपण जाणून घेऊयात या मोबाईलचे खास फीचर्स

   

6.74-इंचाचा डिस्प्ले

Realme Note 50 मध्ये कंपनीने 6.74-इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट सह येत असून तो 1600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. सुरक्षिततेसाठी या मोबाईलला साइड माउंटेड फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. मोबाईल मध्ये Unisoc T612 प्रोसेसर बसवण्यात आला असून हा स्मार्टफोन Android 13 Go ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

कॅमेरा – Realme Note 50

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme Note 50 हा स्मार्टफोन ड्युअल कॅमेरा सेटअप येतो. मोबाईल मध्ये पाठीमागील बाजूला 13MP प्रायमरी AI कॅमेरा आहे तर समोरील बाजूला विडिओ कॉल आणि सेल्फी साठी 5MP कॅमेरा देण्यात आलाय. मोबाईलमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध असून ही बॅटरी 10W USB Type C चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये ड्युअल सिम कार्ड, वाय-फाय, यूएसबी टाइप सी पोर्ट, 3.5 मिमी ऑडिओ जॅक यांसारखे फीचर्स मिळतात.

किंमत किती?

Realme चा Note 50 स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह येतो. हा मोबाईल सध्या भारतात नव्हे तर फिलिपाइन्समध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या मोबाईलची किंमत PHP 3,599 म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 5,400 रुपये आहे. हा स्मार्टफोन मिडनाईट ब्लॅक आणि स्काय ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.