Recharge Plan : आता दर महिन्याला रिचार्ज करण्याची कटकट संपली; VI ने आणले खास प्लॅन

Recharge Plan : भारतीय बाजारपेठेत आपली पकड कायम ठेवण्यासाठी देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांकरिता रोज नवनवीन रिचार्जचे प्लॅन आणत असतात. आता ही  वोडाफोन आयडिया (VI) कंपनीने अशाच 4 प्लॅनसह ग्राहकांसाठी आकर्षित ऑफर्स आणल्या आहेत. ज्यामुळे ग्राहकांचा दर महिन्याला रिचार्ज करण्याचा ताण वाचणार आहे. तसेच या रिचार्जमुळे कंपनी वेगवेगळ्या ऑफर्स देखील ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. आज आपण याच वेगवेगळ्या प्लॅन्सविषयी जाणून घेणार आहोत.

   

3099 रुपयांचा प्लॅन

वोडाफोन आयडिया (VI) ने आणलेल्या ३०९९ या प्लॅनमध्ये प्रतिदिन दोन जीबी डेटा वापरकर्त्यांना उपलब्ध होणार आहे. तसेच यासोबत अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, १०० एसएमएस आणि ती अनलिमिटेड बेनिफि ट्स ही मिळणार आहे. इतकेच नव्हे तर, या प्लॅनमध्ये बिंज ऑल नाइटची देखील स्कीम आहे. यामुळे वापर करता नियमित डेटा न वापरता कित्येक वेळ हवा तो कंटेंट पाहू शकतो. यासोबत सदस्यांना मनोरंजन सामग्रीच्या विस्तृत श्रेणीमध्ये Vi Movies आणि TV VIP प्रवेश, तसेच ५०GB अतिरिक्त डेटा आणि Disney+ Hotstar उपलब्ध असणार आहे.

2999 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला कॉलिंगपेक्षा जास्त डेटा उपलब्ध होणार आहे. २९९९ रुपयांच्या रिचार्जवर वापरकर्त्यांना संपूर्ण वर्षभर सुमारे ८५० GB डेटा मिळणार आहे. याच्यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदिन १०० एसएमएस असणार आहेत. याशिवाय वापरकर्त्यांना Vi Movies आणि TV Classic चा देखील ॲक्सेस मिळेल. या प्लॅनमध्ये बिंज ऑल नाईट उपलब्ध आहे. ज्यामुळे वापर करतात त्याचा नियमित डेटा न वापरता ऑनलाइन कंटेंट पाहू शकतो.

2899 रुपयांचा प्लॅन (Recharge Plan)

या प्लॅनमध्ये सर्वच गोष्टी समाविष्ट आहेत. हा प्लॅन वापरकर्त्यांना १.५ GB डेटा दररोज उपलब्ध करून देतो. त्यामध्ये Vi Hero Unlimited,  All Night, Weekend Data Rollover आणि Data Delights अशा स्कीम उपलब्ध आहेत. तसेच या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, अतिरिक्त 50GB डेटा उपलब्ध आहे. त्यामुळे हा प्लॅन जास्त फायदेशीर ठरत आहे.

1799 रुपयांचा प्लॅन

हा प्लॅन वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज ३६०० एसएमएससह २४ GB चा एक वेळ डेटा ऑफर देते. हा प्लान ३६५ दिवसांचा आहे. यामध्ये सदस्यांना Vi Movies आणि TV Basic चा ॲक्सिस देण्यात येत आहे. यामुळे वापर करते लोकप्रिय चित्रपट आणि टीव्ही शोज पाहू शकतात. हे सर्व प्लॅन वोडाफोन आयडियाने ग्राहकांच्या सेवेत आणले आहेत.