फक्त 334 रुपयात खरेदी करा Redmi चा हा 5G Mobile

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेमध्ये  वेगवेगळ्या ब्रँड चे स्मार्टफोन उपलब्ध आहे. आजकाल ग्राहकांना कमी किमतीत किंवा बजेट मध्ये असलेले  परंतु चांगल्या क्वालिटी आणि फीचर्स ने परिपूर्ण असे मोबाईल घेणे पसंत असते.  तुम्ही देखील कमी किमतीमध्ये प्रीमियम फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर तुम्ही Redmi 12 5G हा मोबाईल अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट वर या स्मार्ट वॉर वर बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. या ऑफरनुसार ग्राहक फक्त 334 रुपयांत हा मोबाईल खरेदी करू शकतात.

   

फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या डिस्काउंट ऑफर सह  एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे. या दोन्ही ऑफरच्या माध्यमातून ग्राहक कमीत कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकतात.  REDMI 12 5G या स्मार्टफोनची किंमत 14999 आहे. परंतु या  स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट या वेबसाईटच्या माध्यमातून  36% डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही 9499 हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्ड च्या माध्यमातून तुम्ही ट्रांजेक्शन करत असाल तर 4 टक्के डिस्काउंट एक्स्ट्रा मिळेल.

EMI ऑफर

REDMI 12 5G या स्मार्टफोनवर EMI ऑफर देखील देण्यात येत आहे. तुम्ही कमी किमतीमध्ये बजेट फ्रेंडली स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला EMI ऑप्शनचा लाभ घेता येऊ शकतो. त्यानुसार तुम्ही 334 रुपये भरून स्मार्टफोन घरी घेऊन जाऊ शकतात. म्हणजेच 334 रुपये महिना भरून स्मार्टफोन खरेदी करता येईल.

स्पेसिफिकेशन

Redmi 12 5G या मोबाइल 6.79 इंच FHD LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2460×1080 पिक्सल रिझोल्युशन आणि  90 HZ रिफ्रेश रेट ऑफर करतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 GEN 2 प्रोसेसर दिले आहे. या स्मार्टफोन मध्ये अँड्रॉइड 13  वर बेस्ड MIUI 14 सॉफ्टवेअर स्क्रीन उपलब्ध करण्यात आली आहे.

कॅमेरा

Redmi 12 5G या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर, प्रायमरी कॅमेरा 50 MP, सेकंडरी कॅमेरा 2 MP, फ्रंट कॅमेरा 8 MP चा  उपलब्ध आहे.  यासोबतच कंपनीने एलईडी फ्लॅश देखील देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 5000 mAh बॅटरी प्रदान करतो.  ही बॅटरी  18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या मोबाइल मध्ये 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज मिळते. Redmi  12 5G या स्मार्टफोनमध्ये  फिंगरप्रिंट सेंसर, यूएसबी ओटीजी सपोर्ट, voLTE, ड्युअल सिम, 5G, हे फिचर्स देण्यात आले आहे.