अखेर Redmi 12 च्या लॉन्चिंगची तारीख ठरली; कमी किमतीत अनेक फिचर्स उपलब्ध

टाइम्स मराठी । भारतात येत्या १ ऑगस्ट रोजी Redmi 12 हा मोबाईल लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा Xiaomi कंपनीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांची रेडमी 12 घेण्यासाठीची प्रतिक्षा संपणार आहे. रेडमी 12 हा स्मार्टफोन यापूर्वी इतर काही देशांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये कंपनीकडून अनेक नवनवीन फिचर अँड करण्यात आले आहेत. आज आपण या मोबाईलचे फीचर्स जाणून घेऊयात.

   

6.79-इंचाचा डिस्प्ले-

या मोबाईल मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.79-इंचाचा फुल-एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. स्मार्टफोन मध्ये mediatekG ८८ चिपसेट देण्यात आली आहे. Redmi 12 हा मोबाईल Android 13 आधारित MIUI 14 वर चालतो. या फोनला ४ GB  रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणार आहे.

कॅमेरा

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायच झाल्यास यामध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर उपलब्ध आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. रेडमीच्या या स्मार्टफोन मध्ये 5,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून ती 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Redmi 12 मोबाईलच्या किमतीबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी हा मोबाईल फक्त १७,००० रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. गेल्या महिन्यातच हा स्मार्टफोन युरोप मध्ये मिडनाईट ब्लॅक, ब्लॅक पोलर सिल्व्हर आणि स्काय ब्लू शेडमध्ये लाँच करण्यात आला आहे. आता भारतात हा मोबाईल फोन लाँच झाल्यानंतर त्याला इथेही चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.