Redmi 13C 5G आणि 4G मोबाईल या दिवशी होणार लाँच; मिळणार खास फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय मार्केटमध्ये लवकरच Redmi 13C 4G स्मार्टफोन सोबतच  REDMI 13C 5G स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. हा फोन भारतीय बाजारपेठेत 6 डिसेंबरला लॉन्च करण्यात येणार आहे. REDMI 13C 5G या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्शन 6100+ चिपसेट उपलब्ध करण्यात येऊ शकते. या अपकमिंग स्मार्टफोन बद्दल जास्त माहिती उपलब्ध करण्यात आली नसली तरीही लीक च्या माध्यमातून स्मार्टफोनमध्ये देण्यात येणाऱ्या बॅटरी आणि स्टोरेज ची माहिती मिळाली आहे. जाणून घेऊया स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन

Redmi 13C 4G या स्मार्टफोनमध्ये  6.74 इंच  HD + डिस्प्ले मिळू शकतो. हा डिस्प्ले 90 hz रिफ्रेश रेट सह येईल. या मोबाईल मध्ये मीडियाटेक हेलीयो  G99 SoC प्रोसेसर मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये 4 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात येणार आहे. हे स्टोरेज मायक्रो एसडी कार्ड च्या माध्यमातून वाढवता येईल. Redmi 13C 5G या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल अजून कोणतीच माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही.

कॅमेरा

मोबाईलच्या कॅमेरा बाबत सांगायचं झाल्यास, Redmi 13C 4G मध्ये 50 MP प्रायमरी कॅमेरा 2 MP लेन्स आणि 2 MP डेप्थ सेंसर देण्यात येऊ शकते. यासोबतच 8 MP फ्रंट कॅमेरा देखील यामध्ये मिळेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर आधारित MIUI 14 वर काम करतो. या मोबाईल मध्ये मध्ये 18 W फास्ट चार्जर देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे Redmi 13C 5G या स्मार्टफोन मध्ये कंपनीकडून 10 W फास्ट चार्जर देण्यात येईल.