5000 mAh बॅटरी सह Redmi 13C 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च 

Redmi 13C 5G । भारतीय बाजारपेठेत Xiaomi ब्रँड चे बरेच स्मार्टफोन उपलब्ध आहेत. आता कंपनीने Redmi 13 C 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोन मध्ये 4G 5G दोन्ही कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात. यापूर्वी कंपनीने Redmi 12 C स्मार्टफोन लॉन्च केला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी कंपनीने नवीन स्मार्टफोन मार्केट मध्ये उपलब्ध केला आहे. या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आलेले असून कॅमेरा कॉलिटी देखील अप्रतिम आहे. जाणून घेऊया स्पेसिफिकेशन आणि फिचर्स.

   

स्पेसिफिकेशन

Redmi 13C 5G या स्मार्टफोनमध्ये  6.74 इंच  HD + LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6100+ प्रोसेसर देण्यात आला असून हा मोबाईल अँड्रॉइड 13 वर आधारित MIUI 14 वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. हे स्टोरेज मायक्रो SD कार्ड च्या माध्यमातून वाढवता येईल. 

कॅमेरा– Redmi 13C 5G mobile

Redmi 13C 5G या मोबाईल मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळते. त्यानुसार 50 MP प्रायमरी कॅमेरा, 2 MP सेकेंडरी डेप्थ सेंसर आणि 5 MP फ्रंट कॅमेरा यामध्ये मिळेल.  या स्मार्टफोन मध्ये 18 W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर, वाय-फाय कनेक्टिव्हिटी हे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे.

किंमत 

Redmi 13C 5G या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, कंपनीने हा मोबाईल तीन स्टोरेज व्हेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. त्यानुसार 4GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आणि 8 GB रॅम,  256 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 13,499 रुपये आहे.  कंपनीने हा मोबाईल स्टार्टरेल सिल्वर, स्टार्टरेल ग्रीन, स्टारलाईट ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये लॉन्च केला.