Redmi 13R 5G मोबाईल लाँच; 50 MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी अन बरंच काही…

टाइम्स मराठी । Redmi कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतात  REDMI 13C 5G स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा 5G कनेक्टिव्हिटी सह बजेट फ्रेंडली स्मार्टफोन होता. आता कंपनीने चिनी मार्केटमध्ये Redmi 13R 5G हा मोबाईल लॉन्च केला आहे. या मोबाईल मध्ये देण्यात आलेले फीचर्स REDMI 13C 5G प्रमाणेच आहेत. कंपनीने लॉन्च केलेला हा स्मार्टफोन  5G कनेक्टिव्हिटी सह उपलब्ध आहे. आज आपण जाणून घेऊया या मोबाईलचे खास फीचर्स आणि किमतीबाबत .

   

स्पेसिफिकेशन

Redmi 13R 5G या स्मार्टफोनमध्ये  6.74 इंच  HD + IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90  hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. कंपनीने या स्मार्टफोनच्या स्क्रीनला प्रोटेक्ट करण्यासाठी गोरीला ग्लास देखील या सोबत उपलब्ध केला आहे. या मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर देण्यात आला असून हा स्मार्टफोन Android 13 वर बेस्ड MIUI 14 वर काम करतो.

कॅमेरा- Redmi 13R 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Redmi 13R 5G मध्ये  50 MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यासोबतच स्मार्टफोनच्या फ्रंट मध्ये 5 MP कॅमेरा मिळतो. या मोबाईल मध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये Type- C चार्जिंग पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक हे फीचर्स मिळतात.

किंमत किती?

Redmi 13R 5G मध्ये कंपनीने 4GB RAM 128 GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. या मोबाईलची किंमत 999 यूआन म्हणजे भारतीय चलनानुसार 11,700 रुपये आहे. हा स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन मध्ये  मिळतो. यामध्ये स्टार रॉक ब्लॅक, फॅन्सी पर्पल आणि वेव वॉटर ग्रीन या रंगांचा समावेश आहे.