Redmi A2+ : 8499 रुपयांत लाँच झाला Redmi A2+; पहा फीचर्स

टाइम्स मराठी । रेडमी कंपनीने भारतात Redmi A2+ स्मार्टफोनचा नवीन वेरियंट लॉन्च केला आहे. हा नवीन लॉन्च करण्यात आलेला व्हेरीएंट ४ जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. रेडमीच्या या मोबाईलची किंमत 8499 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर तुम्ही हा मोबाईल अमेझॉन, MI.Com आणि Xiaomi रिटेल पार्टनर च्या माध्यमातून खरेदी करू शकता.

   

ट्विटरच्या माध्यमातून दिली माहिती

ट्विटरच्या माध्यमातून Xiaomi ने भारतात Redmi A2+ स्मार्टफोनचा नवीन व्हेरिएंट लॉन्च करणार असल्याचं सांगितलं. रेडमी कंपनीच्या A2 या सिरीज ने अगोदरच सर्व ग्राहकांचे मन जिंकून घेतले आहे. आता या सिरीज मधील नवीन व्हेरियंट कंपनी लॉन्च करणार आहे. 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरियंट कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि युजर्स च्या स्टोरेज संदर्भातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे.

Redmi A2+ स्पेसिफिकेशन

Redmi A2+ या स्मार्टफोनचा लॉन्च करण्यात आलेला नवीन व्हेरियंटमध्ये 6.52 इंच चा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1600×720 पिक्सल रिझोल्युशनसह उपलब्ध असून याला 60Hz रिफ्रेश रेट मिळतो. कंपनीने हा स्मार्टफोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉच दिला आहे. या डिस्प्ले वर थिन बेझल्ट देण्यात आलेला असून 120Hz सॅम्पलिंग रेटसह हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.

प्रोसेसर आणि बॅटरी– Redmi A2+

Redmi A2+ हा स्मार्टफोन मीडिया टेक हिलियो G36 Soc प्रोसेसर वर काम करतो. त्याचबरोबर हा मोबाईल OS अँड्रॉइड 13 वर चालतो. स्मार्टफोन मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 10 बॅटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असून एकदा चार्ज केल्यानंतर 32 दिवसांपर्यंत स्टँड बाय मोड आणि 32 तासांचा कॉल टाईम देते . याशिवाय सिंगल चार्ज मध्ये हा स्मार्टफोन 150 तासांचा प्ले टाईम देते.

कॅमेरा

Redmi A2+ च्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडिओ चालल साठी समोरील बाजूला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

Redmi A2+ स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये वायफाय, ब्लूटूथ, एफ एम रेडिओ,3.5 mm हेडफोन जॅक आणि सिक्युरिटी साठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे. कंपनीकडून लवकरच नवीन ट्रिमर लॉन्च करण्यात येणार आहे. 4 सप्टेंबरला हा नवीन ट्रिमर लॉन्च करण्यात येऊ शकतो.