Redmi ने लाँच केले 2 Laptop; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । XIAOMI या चायनीज टेक कंपनीने 29 नोव्हेंबरला मोठा लॉन्च इव्हेंट घेतला. या इव्हेंट मध्ये  Redmi स्मार्टफोन सिरीज सोबतच  लॅपटॉप सिरीज देखील लॉन्च करण्यात आली. यामध्ये कंपनीने Redmi Book 14 आणि Redmi Book 16 हे लॅपटॉप लॉन्च केले आहेत. कंपनीने Redmi Book 14 हा लॅपटॉप स्टार लाईट सिल्वर, स्टारी ग्रे कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे. Redmi Book 16 हा लॅपटॉप स्टारी ग्रे कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. कंपनीने हे दोन्ही लॅपटॉप चीनमध्ये लॉन्च केले आहे. जाणून घेऊया या लॅपटॉप सिरीज चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.

   

XIAOMI REDMI BOOK 14 2024 या लॅपटॉप मध्ये 14 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले  2.8 k म्हणजेच 2880×1800 पिक्सेल रिझोल्युशन आणि 120 hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. यासोबतच 242  ppi पिक्सेल आणि  RGB कलर कव्हरेज सह हा लॅपटॉप उपलब्ध आहे. यामध्ये इंटेल i5 13500H प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसर मध्ये कूलिंग साठी 2 पंखे आणि 2 8 mm हिट पाईप वापरण्यात आले आहे.

XIAOMI REDMI BOOK 14 2024 या लॅपटॉपच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर, हा एक आकर्षक आणि हलक्या डिझाईन मध्ये डेव्हलप करण्यात आलेला लॅपटॉप आहे. या लॅपटॉप चे वजन 1.37 kg एवढे आहे. आणि  15.9  mm थिकनेस मध्ये उपलब्ध आहे.

XIAOMI REDMI BOOK 14 2024 या लॅपटॉप मध्ये 16 GB रॅम आणि 1 TB पर्यंत स्टोरेज यामध्ये  मिळते. यासोबतच लॅपटॉप मध्ये  वेगवेगळे कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील  मिळतात. त्यानुसार थंडरबोल्ट 4, USB A Port, HDMI, 3.5 mm ऑडिओ जॅक  यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स उपलब्ध आहे. लॅपटॉप मध्ये कंपनीने 56 Wh बॅटरी दिली आहे.

XIAOMI REDMI BOOK 16 2024

XIAOMI REDMI BOOK 16 2024 या लॅपटॉप मध्ये 16 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2.5 K रिझॉल्युशन  आणि 120  hz हाय रिफ्रेश रेट ऑफर करतो. हा डिस्प्ले 400 नीट्स ब्राईटनेस ऑफर करतो. कंपनीने या लॅपटॉप मध्ये 100%  SRGM कलर उपलब्ध केले आहे. हा लॅपटॉप i5 13500h प्रोसेसर ने संचालित आहे. त्यानुसार लॅपटॉप फ्लॅगशिप ग्रेड मेमरी प्रदान करतो.

XIAOMI REDMI BOOK 16 2024 या लॅपटॉप मध्ये 72 wh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 1 TB पर्यंत SSD, कनेक्टिव्हिटी साठी थंडरबोल्ट 4, USB A PORT, HDMI, 3.5 mm ऑडिओ जॅक यासारखे कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात. हा लॅपटॉप हलक्या फुल मेटल बॉडी सह येतो. त्याचे वजन फक्त 1.68 KG एवढे असून 15.9 MM  थिकनेस आहे.

ऍडॉप्टर

XIAOMI REDMI BOOK या लॅपटॉप सिरीज मध्ये  100W GaN एडोप्टर देण्यात आले आहे. हे ऍडॉप्टर कॉम्पॅक्ट आणि पोर्टेबल डिझाईन मध्ये हाय पावर स्मार्ट फास्ट चार्जिंग देते. त्यानुसार तुम्ही लॅपटॉप 35 मिनिटात 50% पर्यंत चार्ज करू शकतात.

किंमत किती?

XIAOMI REDMI BOOK 14 2024 आणि XIAOMI REDMI BOOK 16 2024 या लॅपटॉप सिरीज च्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, 14 इंच डिस्प्ले असलेल्या 16 GB रॅम आणि 512 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या  व्हेरिएंटची किंमत 592 डॉलर म्हणजेच  49,335 रुपये एवढी आहे. यासोबतच 16 GB रॅम आणि 1 TB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 635 डॉलर म्हणजेच 52,919 रुपये आहे.

XIAOMI REDMI BOOK 16 2024 या लॅपटॉपच्या  16 GB रॅम आणि 512 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या  व्हेरिएंटची किंमत 621 डॉलर म्हणजेच  51,752 रुपये एवढी आहे. यासोबतच 16 GB रॅम आणि 1 TB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 663 डॉलर म्हणजेच 55,252 रुपये आहे. या लॅपटॉपची विक्री 1 डिसेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे.