Redmi K70 Extreme Edition : Redmi ने लाँच केलं K70 चं Extreme Edition; पहा किंमत आणि फीचर्स

Redmi K70 Extreme Edition ।प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Redmi ने K70 चं Extreme Edition लाँच केलं आहे. या मोबाईलमध्ये 24 GB पर्यंत रॅम, 6.67-इंच डिस्प्ले आणि 5,500 mAh बॅटरी असे अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. सध्या हा स्मार्ट चीनमध्ये लाँच झाला असून भारतात तो कधी येईल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आज आपण रेडमीच्या या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

   

फीचर्स –

Redmi K70 Extreme Edition मध्ये 144 Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1,220 x 2,712 पिक्सेल रिझोल्यूशन, 480 Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट आणि 4,000 nits पर्यंत पीक ब्राइटनेससह येतो. कंपनीने या मोबाईल मध्ये 4 nm octacore MediaTek Dimensity 9300+ प्रोसेसर बसवला आहे.

कॅमेरा – Redmi K70 Extreme Edition

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Redmi K70 Extreme Edition मध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 20-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये 5,500 mAh बॅटरी असून हि बॅटरी 120 W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 5G, NFC, Wi-Fi, Bluetooth, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट कनेक्टिव्हिटी, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फीचर्स मिळतात.

किंमत किती?

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोनच्या 12 GB RAM + 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 2,599 (अंदाजे 31,000 रुपये ), 12 GB + 512 GB व्हेरिएंटची किंमत किंमत CNY 2,899 (अंदाजे 34,000 रुपये)), 16 GB + 512 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 36,000 रुपये, 16 GB + 1TB मोबाईलची 43,000 रुपये आहे. 24 GB का RAM आणि 1 TB स्टोरेजची किंमत 47,000 रुपये आहे.