Redmi K70 Series : Redmi ने K70 सिरीज अंतर्गत लाँच केले 3 Mobile

Redmi K70 Series । चायनीज टेक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या XIAOMI ने 29 नोव्हेंबरला मोठ्या लॉन्च इव्हेंट घेतला. शाओमी कंपनीच्या या इव्हेंट मध्ये बरेच प्रॉडक्ट लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्टवॉच, TWS इयरफोन यासारख्या बऱ्याच प्रॉडक्ट चा समावेश आहे. यासोबतच कंपनीने REDMI K70 स्मार्टफोन सिरीज देखील लॉन्च केली. या REDMI K70 लाईनअप मॉडेल मध्ये K70e, K70 आणि K70 pro या स्मार्टफोनचा समावेश आहे. त्यापैकी K70 pro हे K सिरीज मधील टॉप एंड मॉडेल असल्याचे देखील सांगण्यात आलं. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन– Redmi K70 Series

REDMI K70 आणि REDMI K70 PRO या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच TCL C8 OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2K रिझोल्युशन आणि 120 HZ रिफ्रेश रेट ऑफर करतो. K70 या स्मार्टफोनमध्ये (Redmi K70 Series) कंपनीने स्नॅपड्रॅगन 8 GEN 2 SOC प्रोसेसर दिले आहे. REDMI K70 PRO मध्ये नवीन फ्लॅगशीप स्नॅपड्रॅगन 8 GEN 3 प्रोसेसर देण्यात आले आहे. या दोन्ही मॉडेल मध्ये 5000MAH बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 120w फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

REDMI K70 कॅमेरा

REDMI K70 या स्मार्टफोनच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर कंपनीने हा स्मार्टफोन डिओ एक रेक्टँगुलर कॅमेरा आणि एक बॉक्सी मेटल फ्रेम सह उपलब्ध केला आहे. REDMI K70 आणि REDMI K70 PRO आणि स्टॅंडर्ड व्हेरियंटमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप मिळतो. त्यानुसार OIS सपोर्टसह 50 MP प्रायमरी कॅमेरा यामध्ये देण्यात आला आहे. K70 मध्ये 8 MP अल्ट्राव्हाइड अँगल कॅमेरा, 2 MP मायक्रो युनिट मिळत असून REDMI K70 PRO या मॉडेलमध्ये 2X झूम सह 50 MP टेलीफोटो युनिट आणि 12 MP अल्ट्रावाइड लेंस देण्यात आली आहे. K70 DUO वर 16 MP फ्रंट फेसिंग सेल्फी स्नॅपर देण्यात आले आहे.

दुसरीकडे, REDMI K70e या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.67 इंच OLED Eye प्रोटेक्शन डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120 HZ रिफ्रेश रेट आणि 1800 NITS ब्राईटनेस ऑफर करतो. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये MEDIATEK DIMENSITY 8300 ultra प्रोसेसर वापरला आहे. यामध्ये 5500 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 90W रॅपिड चार्जिंग फीचर्स सह उपलब्ध आहे.

REDMI K70e कॅमेरा

REDMI K70e या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप मिळतो. त्यानुसार प्रायमरी कॅमेरा 64 MP, सेकंडरी कॅमेरा 8 MP, 2 MP मायक्रो लेन्स आणि 16 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच हा स्मार्टफोन 12 GB + 256 GB स्टोरेज, 12 GB + 512 GB स्टोरेज, 16 GB + 1TB स्टोरेज या तीन स्टोरेज व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये ink feather, clean snow, Shadow green हे तीन कलर ऑप्शन दिले आहे.

REDMI K70 किंमत

REDMI K70 या स्मार्टफोन च्या किमती बद्दल बोलायचं झालं तर 12 GB + 256 GB स्टोरेज व्हेरियंट ची किंमत 352 डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार 29,336 रुपये एवढी आहे. तर 16 GB + 256 GB स्टोरेज व्हेरियंट ची किंमत 381 डॉलर म्हणजेच 31,353 रुपये आणि 16 GB + 512 GB स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत 423 डॉलर म्हणजेच 35,254 रुपये आहे.

REDMI K70 PRO किंमत

REDMI K70 PRO या मॉडेलच्या 12 GB + 256 GB स्टोरेज व्हेरियंट ची किंमत 465 डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार 38,754 रुपये एवढी आहे. 16 GB + 256 GB स्टोरेज व्हेरियंट ची किंमत 508 डॉलर म्हणजेच 42,338 रुपये, तर 16 GB + 512 GB स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत 550 डॉलर म्हणजेच 45,838 रुपये आहे.

REDMI K70e किंमत

REDMI K70e या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, 12 GB रॅम 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 23,497 रुपये आहे. 12 GB रॅम 512 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 25,847 रुपये आहे. आणि 16 GB + 1TB स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत म्हणजे 30,549 रुपये आहे.