Redmi Note 12 5G वर बंपर डिस्काउंट; खरेदीसाठी मोठी संधी

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या ब्रँड चे Smartphone उपलब्ध आहे. आजकाल ग्राहकांना कमी किमतीत किंवा बजेट मध्ये असलेले परंतु चांगल्या क्वालिटी आणि फीचर्सने परिपूर्ण असे स्मार्टफोन घेणे पसंत असते. सध्या फेस्टिव सिझन सुरू असून जर तुम्ही बजेटनुसार किंवा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्सची वाट पाहत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. शाओमीच्या Redmi Note 12 5G या स्मार्टफोनवर कंपनीकडून जबरदस्त ऑफर देण्यात येत आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनवर उपलब्ध असलेली ऑफर.

   

Redmi Note 12 5G या स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर बद्दल बोलायचं झालं तर हा स्मार्टफोन तुम्ही 14,999 च्या सुरुवाती किमतीमध्ये खरेदी करू शकतात. कंपनीकडून या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना दोन हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. यासोबतच तुम्ही ह्या स्मार्टफोन EMI ऑफरवर देखील खरेदी करू शकता. त्यानुसारदर महिन्याला तुम्हाला रुपयांचा हप्ता भरावा लागेल.

काय आहेत Redmi Note 12 5G चे फीचर्स- Redmi Note 12 5G

Redmi Note 12 5G या स्मार्टफोन 6.67 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 HZ रिफ्रेश रेटसह येतो तसेच 1200 निट्स पीक ब्राईटनेस प्रदान करतो. हा स्मार्टफोन GOLRILA GLASS 3 ने प्रोटेक्ट केला आहे. मोबाईल मध्ये स्नॅपड्रॅगन 4 Gen1 6 nm ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

Redmi Note 12 5G या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर, 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलआज अल्ट्रा वाईड अँगल आणि दोन मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच विडिओ कॉल आणि सेल्फी साठी समोरील बाजूला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. यासोबतच कंपनीने एलईडी फ्लॅश देखील दिला आहे. रेडमीच्या या मोबाईल मध्ये 5000 mAh बॅटरी बसवण्यात आली आहे. ही बॅटरी 33 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Redmi Note 12 5G या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर, यूएसबी ओटीजी सपोर्ट, voLTE, ड्युअल सिम, फाईव्ह जी, splashproof IP53 हे फिचर्स देण्यात आले आहे. या मोबाईलचे वजन 188 ग्रॅम एवढे आहे.