Redmi Note 13 Series : Xiaomi चा धमाका!! Redmi Note 13 सिरीज अंतर्गत लाँच केले 3 नवे मोबाईल

Redmi Note 13 Series : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Xiaomi ने Redmi Note 13 सिरीज अंतर्गत ३ नवे मोबाईल लाँच केले आहेत. Redmi Note 13 5G, Note 13 Pro 5G आणि Note 13 Pro+ 5G असे या तिन्ही मोबाईलची नावे आहेत. या सिरीज मध्ये 200 MP कॅमेरासह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे मार्केट मध्ये रेडमीचे हे मोबाईल धुमाकूळ घालणार हे नक्की…. आज आपण जाणून घेऊयात या तिन्ही मोबाईलचे खास फीचर्स आणि किमतीबाबत…

   

१) Redmi Note 13 5G

Redmi Note 13 5G कंपनीने 120Hz रिफ्रेश रेट सह 6.67 इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सेल रिसोल्युशन आणि 1,000 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करतो. या मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 6080 चीप बसवण्यात आली असून Android 13 वर आधारित MIUI 14 वर तो काम करतो. Redmi Note 13 5G मध्ये कंपनीने 108-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आणि समोरील बाजूला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच या मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Redmi Note 13 5G च्या 6GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये , 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे आणि 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे.

२) Redmi Note 13 Pro 5G– Redmi Note 13 Series

Redmi Note 13 Pro 5G मध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून हा डिस्प्ले 1220×2712 पिक्सेल रिझोल्युशन आणि 1,800 nits पीक ब्राइटनेस सह येतो. या मोबाईल मध्ये कंपनीने (Redmi Note 13 Series) Snapdragon 7s Gen 2 प्रोसेस दिला आहे. Redmi Note 13 Pro 5G मध्ये 200-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा देणार आलाय. तर समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi Note 13 Pro 5G मध्ये 5,100mAh बॅटरी आहे जी 67W चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Redmi Note 13 Pro 5G च्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 25,999 रुपये आहे, 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 27,999 रुपये आणि 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे.

३) Redmi Note 13 Pro+ 5G

Redmi Note 13 Pro+ 5G मध्ये कंपनीने 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे. या मोबाईल मध्ये Dimensity 7200-Ultra SoC प्रोसेसर दिला आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Redmi Note 13 Pro+ 5G मध्ये सुद्धा 200-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तर समोरील बाजूला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 120W चार्जिंगला सपोर्ट करते. Redmi Note 13 Pro+ 5G च्या 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. तर 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 33,999 रुपये 12GB + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 35,999 रुपये आहे.