Redmi Note 13 Series भारतात लवकरच होणार लाँच; मिळणार ‘हे’ खास फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये सर्वच मोबाईल निर्माता कंपन्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी एकापेक्षा एक स्मार्टफोन लॉन्च करत असतात. ग्राहकांना कमी पैशात आकर्षक आणि अनेक फीचर्सने सुसज्ज असे मोबाईल बाजारात आणून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचा कंपन्यांचा कल असतो. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मोबाईल ब्रँड रेडमी लवकरच Redmi Note 13 Series सिरीज लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनीकडून Redmi Note 13 5G, Redmi Note 13 pro, Redmi Note 13 pro Plus हे स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. सध्या तरी हे स्मार्टफोन चिनी बाजारपेठेमध्ये उपलब्ध असून लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यात येतील.

   

मिळणार ‘हे’ खास फीचर्स- Redmi Note 13 Series

Redmi Note 13 5G या स्मार्टफोनमध्ये 6.65 इंच IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080× 2460 पिक्सल रिझोल्युशन, 20:1:9 अस्पेक्ट रेशो आणि 90 hz रिफ्रेश रेटसह येतो. या स्मार्टफोनची स्क्रीन गोरिला ग्लास v5 ने प्रोटेक्टेड आहे. रेडमीच्या या मोबाईल मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिप्स उपलब्ध आहे. यासोबतच Redmi Note 13 pro आणि Redmi Note 13 pro plus या दोन्ही स्मार्टफोन मध्ये 6.67 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. Redmi Note 13 pro मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7200 चीप सेट उपलब्ध असून Redmi Note 13 pro plus मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7200 अल्टा चिपसेट उपलब्ध आहे.

Redmi Note 13 5G या स्मार्टफोन मध्ये ट्रिपल रियल कॅमेरा उपलब्ध आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल , सेकंडरी कॅमेरा ८ मेगापिक्सल, आणि दोन मेगापिक्सेल मायक्रो सेन्सर हे उपलब्ध आहे. यासोबत कंपनीने LED Flash दिला असून यासोबत डिजिटल झूम, ऑटो फ्लॅश, फेस डिटेक्शन, टच टू फोकस हे फिचर्स देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर Redmi Note 13 pro आणि Redmi Note 13 pro Plus मध्ये 200 मेगा पिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगा पिक्सल अल्ट्रावाईड, दोन मेगापिक्सल मायक्रो सेंसर उपलब्ध आहे.

Redmi Note 13 pro plus हा स्मार्टफोन ब्ल्यू लाईट, नो फ्लिकर, आय प्रोटेक्शन स्क्रीन यासह लॉन्च करण्यात येऊ शकतो. सध्या Redmi Note 13 Series चिनी मार्केटमध्ये उपलब्ध असून या स्मार्टफोनच्या किमती बद्दल अजूनही खुलासा करण्यात आलेला नाही.